Chhatrapati Shivaji Maharaj : शिवकालीन वास्तू, शस्त्र संवर्धनासाठीच्या समितीत शिवरायांच्या सरदारांच्या वारसदारांना स्थान

170
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवकालीन वास्तू, शस्त्र संवर्धनासाठीच्या समितीत शिवरायांच्या सरदारांच्या वारसदारांना स्थान
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवकालीन वास्तू, शस्त्र संवर्धनासाठीच्या समितीत शिवरायांच्या सरदारांच्या वारसदारांना स्थान

शिवकालीन घराण्यांच्या ऐतिहासिक वास्तू, शस्त्र संवर्धन व दस्त संकलन संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने  १६ सदस्य असलेल्या एका समितीची स्थापना केली असून या समितीत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्य स्थापनेत ज्या सहकाऱ्यांनी हातभार लावला, अशा शूरवीर, सरदार घराण्यातील १० वारसदारांना या समितीत स्थान देण्यात आले आहे.

दहा वारसदार

यामध्ये श्रीमंत सरदार कान्होजी राजे जेधे-देशमुख यांचे वारसदार इंद्रजीत नेताजीराव जेधे, श्रीमंत सरदार रायाजी बांदल-देशमुख यांचे वारसदार अनिकेत बांदल, सरदार हिरोजी इंदलकर यांचे श्रीनिवास इंदलकर, सरलष्कर सिदोजी नाईक-निंबाळकर यांचे वारस हृषीकेश नाईक-निंबाळकर, पंत अमात्य बावडेकर यांचे वारस निळकंठ बावडेकर, सरदार येसाजी कंक यांच्या घराण्यातील रवींद्र कंक, सरदार शिरोळे यांचे वारसदार अभयराज शिरोळे, सरदार पिलाजी सणस यांचे बाळासाहेब उर्फ रामदास सणस, सरदार जयताजी करंजावणे यांचे वारस गोरख करंजावणे आणि बकाजी व कोंडाजी फर्जंद यांचे वारसदार सचिन बाबुराव भोसले यांचा समावेश आहे.

(हेही वाचा-World Braille Day : भेटा ब्रेल लिपी तयार करणार्‍या अद्भुत शिक्षणतज्ञाला…)

पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय अध्यक्ष

या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र व स्वराज्य घडविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या शिवकालीन घराण्याच्या ऐतिहासिक वास्तु, शस्त्र संवर्धन व दस्त संकलन संवर्धन उद्देशासाठी संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

समकालीन दस्तावेजांचे व कागदपत्रांचे डिजिटायझेशन व जतन

या समितीची कार्यकक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य निर्मितीस महत्त्वाचा हातभार लावणाऱ्या सरदार घरण्यासंबंधी ऐतिहासिक वास्तूंची यादी व दस्तावेजीकरण करण्यास मार्गदर्शन करणे, या सरदार घराण्याशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक व मौल्यवान पुरावस्तू आणि पुरावशेष यांची यादी व त्याचे दस्तावेजिकरण तयार करण्यास मार्गदर्शन करणे तसेच या संबंधित समकालीन दस्तावेजांचे व कागदपत्रांचे डिजिटायझेशन व जतन करून त्याचे संवर्धन करण्यास सहाय्य करून यासंबंधीत वास्तूंचे PPP mode मध्ये जतन संवर्धन कार्याचा व पर्यटनवृद्धीचा आराखडा तयार करणे अशी असेल. तसेच यासंबंधी संशोधनासाठी त्या भागातील नामवंत विद्यापीठातील आध्यासान केंद्रे, इतिहास व पुरातत्वविभाग यांची मदत घेता येईल.

समिती सरदार घराण्यासंबंधी ऐतिहासिक वास्तूंची व कागदपत्रांचे संग्रहालय म्हणून एकत्रित विकास करण्यासंदर्भात सहकार्य करेल आणि सदर समितीच्या नियमित बैठका घेण्यात येऊन त्यानुषंगाने योग्य प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांची असेल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.