Rohit Sharma : ‘या’ कामगिरीमुळे रोहित शर्मा विराट आणि धोनीच्या पंक्तीत

रोहित शर्मासाठी महत्त्वाचा असलेला हा सामना मुंबईने मात्र गमावला

92
Rohit Sharma : ‘या’ कामगिरीमुळे रोहित शर्मा विराट आणि धोनीच्या पंक्तीत
Rohit Sharma : ‘या’ कामगिरीमुळे रोहित शर्मा विराट आणि धोनीच्या पंक्तीत
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा मुंबई इंडियन्सचा एक आयकॉनिक स्टार खेळाडू आहे. आणखी एका गोष्टीमुळे हे सिद्ध झालंय. रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्ससाठी २०० आयपीएल सामने खेळलेला तो पहिला खेळाडू ठरलाय. बुधवारी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धचा सामना रोहितचा दोनशेवा सामना होता. त्याबरोबरच तो विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसलाय.

मुंबईसाठी दोनशेवा सामना असला तरी आयपीएलमध्ये सगळे मिळून रोहित २४५ सामने खेळले आहेत. आणि या बाबतीत २५२ सामने खेळून एकटा धोनी रोहितच्या पुढे आहे. २०११ मध्ये रोहीत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. आणि तेव्हापासून तो संघाचा अविभाज्य भाग आहे. ५ वेळा त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएल स्पर्धा जिंकून दिली आहे. मागच्या १४ हंगामात रोहित फक्त ६ सामन्यांसाठी गैरहजर होता. बाकी सातत्याने तो मुंबईसाठी खेळलाय.

(हेही वाचा – IPL 2024, MI vs SRH : मुंबईचा सलग दुसरा पराभव, हैद्राबादच्या २७७ धावांच्या ओझ्याखाली मुंबई दबली)

आयपीएलमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) ५,००० च्या वर धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्ससाठी सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज रोहीतच आहे. मुंबईसाठी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्याही सचिन नंतर रोहितच्याच नावावर आहे. २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ईडन गार्डन्स इथं त्याने नाबाद १०९ धावा केल्या होत्या. रोहितच्या दोनशेव्या सामन्यापूर्वी संघाचा मेंटॉर सचिन तेंडुलकरच्या हस्ते रोहीतला २०० क्रमांकाची विशेष जर्सी प्रदान करण्यात आली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कोणाला मिळणार संधी ?)

फक्त फलंदाज म्हणून नाही तर कर्णधार म्हणूनही रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईसाठी यशस्वी ठरला आहे. फ्रँचाईजीच्या १११ विजयांमध्ये रोहितने योगदान दिलं आहे. तर यातील ८७ सामन्यांमध्ये रोहित कर्णधारही होता. रोहित हा मुंबई इंडियन्ससाठी सगळ्यात यशस्वी फलंदाज आणि कर्णधारही आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.