Lok Sabha Election 2024 : ठाण्यात भंगारात सापडले आठ EVM मशीन  

दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बंद खोलीत ३५० ट्रंकांमध्ये निवडणूक साहित्य

173
Baramati LS constituency : ‘एक व्होट की किमत तूम क्या जानो’
Baramati LS constituency : ‘एक व्होट की किमत तूम क्या जानो’

देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Lok Sabha Election 2024)  दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. अशातच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत (EVM VVPAT) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या आहेत. दरम्यान, ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चक्क भंगार सामानात आठ ईव्हीएम सापडल्या. त्यामुळे नागरिकांकडून निवडणूक आयोगावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.  (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Mumbai Pune Expressway : खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक घेतला पेट, ३६ प्रवाशी थोडक्यात बचावले)

ठाणे महापालिकचे दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या (Dadoji Konddev Stadium) प्रेक्षक गॅलरी (स्टँड) खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. त्यातील एका खोलीचा दरवाजा तुटल्याने तो दुरुस्त करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे कर्मचारी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तेथे गेले. त्याचवेळी एका ट्रंकमधून आठ ईव्हीएम (Eight EVM machines) हस्तगत करण्यात आले. मात्र, या खोलीत तब्बल ३५० ट्रंक असून मनुष्यबळाअभावी त्याची तपासणी झालेली नाही. कदाचित या अन्य ट्रंकमध्ये ईव्हीएम असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे यावेळी उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा  – Uttarakhand Wildfire : उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भीषण वणवा, आयटीआय भवन जळालं)

कोंडदेव स्टेडियममधील खोलीची तपासणी ही राजकीय पक्षांना पूर्वसूचना देत त्यांच्या प्रतिनिधींनच्या समक्ष करण्यात आली. या खोल्यांमध्ये जुन्या जि. प. निवडणुकीचे साहित्य, लिफाफे तसेच एका ट्रंकमध्ये ईव्हीएम मशीन आढळले. याबाबत सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना सादर केला आहे. हे EVM मशीन वापरत नसून, लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. तसेच या प्रक्रियेचे चित्रीकरण केले आहे. अशी माहिती शिनगारे यांनी दिली.  (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.