Mumbai Pune Expressway : खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक घेतला पेट, ३६ प्रवाशी थोडक्यात बचावले

138
Mumbai Pune Expressway : खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक घेतला पेट, ३६ प्रवाशी थोडक्यात बचावले
Mumbai Pune Expressway : खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक घेतला पेट, ३६ प्रवाशी थोडक्यात बचावले

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) मावळ (maval) तालुक्यातील आढे गावाजवळ (किमी 78) पुणे मार्गिकेवर एका खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक पेट घेऊन लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाली. या बस मध्ये 36 प्रवासी होते. प्रसंगवधान राखत सर्व प्रवासी व चालक हे बसमधून बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज (२७ एप्रिल) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. (Mumbai Pune Expressway)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजता आढेगावच्या हद्दीत साडे सातच्या दरम्यान खासगी बसचा टायर फुटला. त्यामुळे बस जागेवरच पेटली. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानं संपूर्ण बसने पेट घेतला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. (Mumbai Pune Expressway)

(हेही वाचा- Uttarakhand Wildfire : उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भीषण वणवा, आयटीआय भवन जळालं)

बस पुण्याच्या (Pune) दिशेने जात असताना टायर फुटला व त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्याने बसला आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव (Vadgaon) वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवण्यात आली आहे. एक्सप्रेस वे च्या वरून गावांना जोडणाऱ्या पुलाखालीच ही घटना घडल्याने पुलावर काही काळ धुराचा लोट उसळला होता. सदर घटनेतसुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. (Mumbai Pune Expressway)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.