Uttarakhand Wildfire : उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भीषण वणवा, आयटीआय भवन जळालं

167
Uttarakhand Wildfire : उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भीषण वणवा, आयटीआय भवन जळालं
Uttarakhand Wildfire : उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भीषण वणवा, आयटीआय भवन जळालं

उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण (Uttarakhand Wildfire) वणवे भडकत असून, नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल (Nainital) भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली आहे. त्यामुळे जंगलातील एका मोठ्या भागाबरोबरच आयटीआय भवन जळालं आहे. नैनीतालमधीस लडियाकांटा क्षेत्रातील जंगलातही वणवा पेटला आहे. या भीषण वणव्यांमुळे नैनीताल येथून भवाली येथे जाणाऱ्या रस्त्यावर धुराचे लोट येत आहेत. तसेच वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. (Uttarakhand Wildfire)

या भागात वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैनीतालजवळील लडियाकांटा येथे लागलेली आग लष्कराच्या ताब्यात असलेल्या भागांपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लष्कराच्या जवानांकडूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Uttarakhand Wildfire)

(हेही वाचा- Swine Flu: महाराष्ट्राला स्वाइन फ्लूचा धोका? मालेगावात दोघांचा मृत्यू)

प्रशासनाकडून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नैनीताल आणि भीमताल (Bhimtal) येथील तलावांमधून पाणी नेऊन हा वणवा शमवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नैनीतालसह कुमाऊंच्या जंगलांमध्येही आग लागली आहे. नैनीतालच्या बलदियाखान, ज्योलिकोट, मंगोली, खुरपाताल. देवीधुरा, भवाली, पाईनस, भीमताल मुक्तेश्वरसह आजूबाजूच्या जंगलांमध्येही वणवे पेटले आहेत.
यादरम्यान, नैनीताल जिल्हा मुख्यालयाजवळ लागलेल्या आगीने अधिकच भीषण रूप धारण केले आहे. त्यामुळे पाईन्स भागात असलेल्या हायकोर्ट कॉलनीतील रहिवासी भागाला धोका निर्माण झाला आहे. मात्र या वणव्यामुळे हायकोर्ट कॉलनीमध्ये अद्याप कुठलेही नुकसान झालेले नाही. (Uttarakhand Wildfire)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.