Amol Kirtikar ED : ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून समन्स; ईडीकडे मुदतवाढीची मागणी

"लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होताच त्यांना ईडीकडून समन्स प्राप्त झाले. हा फक्त घाबरवण्याचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही घाबरणार नाही," असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

154
Amol Kirtikar ED : ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून समन्स; ईडीकडे मुदतवाढीची मागणी

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अशातच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर (Amol Kirtikar ED) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उमेदवारी जाहीर होताच ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने बुधवार २७ मार्च रोजी हे समन्स बजावले आहे.

(हेही वाचा – Nirmala Sitharaman : लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत)

आम्ही घाबरणार नाही :

“लोकसभा निवडणुकीचे उमेदवार (Amol Kirtikar ED) म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होताच त्यांना ईडीकडून समन्स प्राप्त झाले. हा फक्त घाबरवण्याचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही घाबरणार नाही,” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

अमोल कीर्तिकरांची ईडीकडे मुदतवाढीची मागणी :

कोरोना काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वितरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar ED) यांना बुधवारी ईडीने चौकशीसाठी समन्स जारी केले. मात्र, ते पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याने ईडी चौकशीला येऊ शकणार नसल्याचे सांगत त्यांच्या वकिलाने या प्रकरणी चौकशीसाठी ईडीकडे मुदतवाढ मागितली.

(हेही वाचा – Rohit Sharma : ‘या’ कामगिरीमुळे रोहित शर्मा विराट आणि धोनीच्या पंक्तीत)

दापोली येथील घरावरही ईडीची छापेमारी :

ईडीच्या अधिकाऱ्यांनी (Amol Kirtikar ED) त्यांना मुदतवाढ दिली अथवा नाही, या संदर्भात माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, कीर्तिकर यांच्या दापोली येथील शिर्दे गावातील घरावरही ईडीने छापेमारी केल्याची माहिती आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.