Lok Sabha Election 2024 : शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कोणाला मिळणार संधी ?

महायुतीचा जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजुनही काही जागांबाबतचा तिढा कायम आहे. तर काही जागांवर अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

159
Shinde Group : मुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती; तरीही शिंदे गटाची प्रचाराची ठरली रणनीती

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार (२७ मार्च) शेवटचा दिवस होता. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी पर्यंत २२९ अर्ज दाखल झाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Government Bonds : महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस)

एकूण २२९ अर्ज दाखल :

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक ५१, नागपूर ६२, भंडारा-गोंदिया ४९, गडचिरोली-चिमूर १९ आणि चंद्रपूर ४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

जागावाटपाचा तिढा अजूनही कायम :

तर दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा (Lok Sabha Election 2024) तिढा अजूनही कायम आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजुनही काही जागांबाबतचा तिढा कायम आहे. तर काही जागांवर अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

अशातच आज म्हणजेच गुरुवार २८ मार्च रोजी शिवसेनेची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election : निवडणूक कामासाठी नर्स आणि डॉक्टर्स…महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करणार कोण?)

आठ जागांची यादी जाहीर होण्याची शक्यता :

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (Lok Sabha Election 2024) शिवसेनेची आठ जागांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या यादीत कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार, हे स्पष्ट होणार आहे.

मागील काही दिवसांपासून वाद सुरू असलेल्या नाशिक, यवतमाळ, रायगड, ठाणे आणि मुंबई या जागांवर प्रामुख्यानं लक्ष आहे. महायुतीत अखेर या जागांचा तिढा सुटलाय का? आणि तिढा सुटला असेल तर या जागा कोणाच्या वाट्याला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.