Ranji Trophy 2024 : छत्तीसगड विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवून मुंबई रणजी स्पर्धेच्या बाद फेरीत

छत्तीसगड विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला असला तरी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारताने सामन्यातून ३ गुण मिळवले. मुंबईचे एकूण ३० गुण झाल्यामुळे मुंबईचा बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला आहे.

187
Ranji Trophy 2024 : छत्तीसगड विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवून मुंबई रणजी स्पर्धेच्या बाद फेरीत
  • ऋजुता लुकतुके

रणजी करंडकाच्या एलिट गटात मुंबई संघाने बाद फेरी गाठली आहे. छत्तीसगड विरुद्धचा सामना चौथ्या दिवशी बरोबरीत सुटला. पण, मुंबईसाठी महत्त्वाचं म्हणजे फारसा फॉर्मात नसलेला अजिंक्य रहाणेनं दुसऱ्या डावात नाबाद ५६ धावा केल्या. १२४ धावांच्या खेळीत अजिंक्यने १ षटकार आणि ६ चौकार ठोकले. (Ranji Trophy 2024)

छत्तीसगड विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला असला तरी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारताने सामन्यातून ३ गुण मिळवले. मुंबईचे एकूण ३० गुण झाल्यामुळे मुंबईचा बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला आहे. गेल्यावर्षी मुंबई संघावर साखळी स्पर्धेतच बाद होण्याची वेळ आली होती. (Ranji Trophy 2024)

(हेही वाचा – Ashok Chavan यांनी कोणाच्या सल्ल्यावरून ‘परिवर्तन’ केले? ‘ते’ महंत कोण?)

छत्तीसगड विरुद्ध मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं केलं अर्धशतक

मुंबईचा संघ सध्या बी गटात अव्वल आहे. आणि संघाचा शेवटचा साखळी सामना आसाम विरोधात बीकेसी मैदानावर होणार आहे. हा सामना जिंकून मुंबईला सर्व गटांत सगळ्यात जास्त गुण कमावण्याची संधी आहे. तसं झालं तर उपउपान्त्य फेरीतील मुंबईची लढत सोपी असेल. कारण, सर्व गटांत अव्वल असलेला संघ उपउपांत्य फेरीत प्लेट गटातील अव्वल संघाशी भिडतो. उलट इतर संघ एलिट गटातील गटांत अव्वल संघांशी भिडतात. (Ranji Trophy 2024)

प्लेट गटातील अंतिम सामना हा हैद्राबाद विरुद्ध मेघालय दरम्यान होणार आहे. आणि मुंबई सर्वोत्तम संघ ठरला तर त्यांची लढत यांच्यातील विजेत्यांशी होईल. छत्तीसगड विरुद्धच्या सामन्यात मुंबईसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणेला सापडलेला सूर. मागच्या ३ सामन्यांतील ६ डावांत मिळून त्याने ३३ धावा केल्या होत्या. पण, पण, सोमवारी त्याने दुसऱ्या बाजूने मुंबई संघाची होत असलेली पडझड रोखत नेटाने फलंदाजी केली. मुंबईची अवस्था ५ बाद १८२ झाली असताना अजिंक्यने शार्दूल ठाकूरबरोबर ६२ धावांची भागिदारी करून मुंबईला दुसऱ्या डावात अडिचशेचा टप्पा गाठून दिला. (Ranji Trophy 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.