Ind vs Eng 3rd Test : इंग्लिश संघ तिसऱ्या कसोटीसाठी राजकोटमध्ये दाखल

दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लिश संघ सुटीसाठी आबूधाबीला गेला होता. इंग्लंड संघाने या मालिकेची तयारीही आबूधाबी इथंच केली होती. मध्ये मिळालेल्या १० दिवसांच्या सुटीतही संघाने तिथेच विश्रांती घेणं पसंत केलं. तिथे खेळाडूंनी क्रिकेटबरोबरच गोल्फचाही आनंद लुटला.

213
Ind vs Eng 3rd Test : इंग्लिश संघ तिसऱ्या कसोटीसाठी राजकोटमध्ये दाखल

ऋजुता लुकतुके

तिसऱ्या कसोटीपूर्वी (Ind vs Eng 3rd Test) आबूधाबीत सुटीसाठी गेलेला इंग्लिश संघ एका आठवड्यानंतर सोमवारी (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी भारतात परतला आहे. राजकोट इथं संघ दाखलही झाला आहे. मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना तिसरी कसोटी राजकोटला १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

इंग्लंड संघाने या मालिकेची तयारीही आबूधाबी इथंच केली होती. आणि मध्ये मिळालेल्या १० दिवसांच्या सुटीतही संघाने तिथेच विश्रांती घेणं पसंत केलं. तिथे खेळाडूंनी क्रिकेटबरोबरच गोल्फचाही आनंद लुटला. इंग्लिश संघ भारतात आला असला तरी दुखापतग्रस्त जॅक लीच मायदेशी परत गेला आहे. आणि इंग्लिश संघासाठी हा धक्काच आहे. पहिल्याच कसोटीत लीचचा गुडघा दुखावला होता. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : जायबंदी के एल राहुल ऐवजी देवदत्त पडिकल भारतीय संघात)

पण, इंग्लिश संघाने लीच ऐवजी रेहान अहमदला खेळवलं. आणि टॉम हार्टली, रेहान अहमद आणि शोएब बशीर या फिरकी त्रिकुटासह जौ रुटही चौथा फिरकी गोलंदाज म्हणून इंग्लिश संघाने वापरला आहे. आता राजकोटमधील खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जात आहे. (Ind vs Eng 3rd Test)

मंगळवारी सकाळी इंग्लिश संघाचं (Ind vs Eng 3rd Test) सरावाचं पहिलं सत्रही पार पडलं आहे. या मालिकेत पहिली हैद्राबाद कसोटी भारतीय संघाने २८ धावांनी जिंकली. तर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. आणि आतापर्यंतचा खेळ पाहता ही मालिका तुल्यबळ आणि रंगतदार होईल अशीच चिन्हं आहेत.

(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी)

इंग्लंडने (Ind vs Eng 3rd Test) आतापर्यंत मालिकेत बॅझ-बॉल ही आक्रमक रणनीती वापरली आहे. आणि भारतीय फिरकीला खेळण्यासाठी त्यांनी स्वीप, स्कूप आणि रिव्हर्स स्वीपचे फटके खेळण्याचं तंत्र अवलंबलं आहे. पहिल्या हैद्राबाद कसोटीत ते यशस्वीही ठरलं. आताही आबूधाबीत भारतीय फिरकीपटूंना कसं खेळायचं यावरच इंग्लिश फलंदाजांनी लक्ष केंद्रीत केलं होतं.

(हेही वाचा – Ashok Chavan यांनी कोणाच्या सल्ल्यावरून ‘परिवर्तन’ केले? ‘ते’ महंत कोण?)

तर भारतीय संघही राजकोटला पोहोचला असून भारतासाठी जसप्रीत बुमराची तेज गोलंदाजी आणि अश्विन, जाडेजाची फिरकी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. (Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.