Ind vs Eng 3rd Test : जायबंदी के एल राहुल ऐवजी देवदत्त पडिकल भारतीय संघात

के एल राहुल कमरेच्या दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याला तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही

209
Ind vs Eng 3rd Test : जायबंदी के एल राहुल ऐवजी देवदत्त पडिकल भारतीय संघात

ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी (Ind vs Eng 3rd Test) भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. जायबंदी के एल राहुल दुखापतीतून न सावरल्यामुळे तो तिसरी कसोटी खेळू शकणार नाहीए. आणि त्याच्या ऐवजी देवदत्त पडिक्कलची भारतीय संघात वर्णी लागली आहे. पण, दोनच दिवसांपूर्वी भारतीय संघ जाहीर झालेला असताना लगेच हा बदल करावा लागणं म्हणजे बीसीसीआयच्या खेळाडू व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.

(हेही वाचा – Ashok Chavan आज भाजपमध्ये प्रवेश करणार)

‘के एल राहुलची तीन कसोटींसाठी झालेली निवड ही त्याच्या उपस्थितीवरच अवलंबून होती. सध्या तो ९० टक्के तंदुरुस्त आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. पण, राजकोट कसोटीसाठी तो उपलब्ध होऊ शकणार नाही,’ असं बीसीसीआयच्या पत्रकात म्हटलं आहे. (Ind vs Eng 3rd Test)

राहुल अजूनही बंगळुरूतील क्रिकेट अकादमीतच आहे. तर रवींद्र जाडेजा मात्र संघाबरोबर राजकोटला पोहोचला आहे. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Hemant Soren यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ)

२३ वर्षीय देवदत्त पडिक्कल यंदाच्या रणजी हंगामात चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या शेवटच्या सामन्यात त्याने १५१ धावांची खेळी केली. ती पाहायला निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर स्वत: हजर होते. तर त्याने पंजाब (१९३) आणि गोवा (१०३) विरुद्धही शतकं ठोकली आहेत. अगदी अलीकडे इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळताना भारतीय ए संघाकडून त्याने तीन डावांत १०५, ६५ आणि २१ धावा केल्या होत्या. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Sarojini Naidu : पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू)

खेळाडूंच्या दुखापतींचं व्यवस्थापन हा मुद्दा मात्र त्यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. राहुल नेमका किती तंदुरुस्त आहे आणि तो कधी तंदुरुस्त होईल हे बीसीसीआयला ठाऊक नव्हतं का, हा पहिला प्रश्न आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी निवडलेल्या संघात त्याचा ‘उपलब्ध असेल तर’ या निकषाखाली समावेश झाला होता. आणि दोनच दिवसांत तो अनुपलब्ध असल्याचं कळतंय. तर श्रेयस अय्यरचा फॉर्म खराब असताना आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला रणजी खेळण्याचा सल्ला दिलेला असताना तो दुखापतींचं कारण सांगून खेळत नाहीए. आणि बीसीसीआयने संघ निवड जाहीर करताना त्याच्या दुखापतीविषयी काहीही स्पष्टता दिलेली नाही. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – UP STF Halal Council : यूपी एसटीएफकडून हलाल कौन्सिल ऑफ इंडियाच्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक)

इशान किशननेही रणजी खेळण्याविषयी आपल्या राज्य संघटनेशी चर्चा केली आहे का, यावरही बीसीसीआय गप्पच आहे.(Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.