Ashok Chavan आज भाजपमध्ये प्रवेश करणार

अशोक चव्हाण यांनी सोमवार १२ फेब्रुवारी रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

247
Ashok Chavan आज भाजपमध्ये प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेशास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा देखील आज मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता भाजप पक्षप्रवेश होणार आहे. तसेच त्यांच्यासोबत काँग्रेसचे ७ ते ८ आमदारही प्रवेश करणार आहेत.

(हेही वाचा – ED Summons Farooq Abdullah : फुटीरतावादी नेते फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे समन्स)

देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे उपस्थित राहणार –

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

(हेही वाचा – Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी केले भारताचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण)

अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला राजीनामा –

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवार १२ फेब्रुवारी रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी नंतर आता अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

(हेही वाचा – Community Radio : भारतातील कम्युनिटी रेडिओची २० वर्षे साजरी)

चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार? 

राहुल नार्वेकर यांचा रविवारी (११ फेब्रुवारी) वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून (Ashok Chavan) सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असा जाणकारांचा अंदाज होता. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. कारण ते काँग्रेसमध्ये नाराज आहे, अशी चर्चा होती. (Ashok Chavan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.