ED Summons Farooq Abdullah : फुटीरतावादी नेते फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे समन्स

ED Summons Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेल्या निधीचा व्यक्तीगत लाभासाठी वापर केला.

253
ED Summons Farooq Abdullah : फुटीरतावादी नेते फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे समन्स
ED Summons Farooq Abdullah : फुटीरतावादी नेते फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे समन्स

फुटीरतावादी नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. फारुख अब्दुल्ला यांना मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (Jammu and Kashmir Cricket Association) मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. (ED Summons Farooq Abdullah)

(हेही वाचा – Vishva Hindu Parishad: अयोध्येतील कार्यक्रमात देशभरातून ८ कोटी लोकांचा सहभाग)

निधीचा व्यक्तीगत लाभासाठी वापर

ईडीने (ED) पाठवलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेल्या निधीचा व्यक्तीगत लाभासाठी वापर केला. हा निधी अनेक खाजगी बँक खाती आणि जवळच्या नातेवाईकांकडे वळवण्यात आल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे. 2001 ते 2012 दरम्यान फारुख अब्दुल्ला जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असतांना हा कथित घोटाळा झाला होता.

काय आहे आरोप ?

ईडीने 2018 मध्ये या प्रकरणाचा तपास चालू केला आहे. सीबीआयच्या आरोपपत्राच्या आधारे या प्रकरणात पीएमएलएची चौकशी सुरु केली. BCCI ने जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनला 112 कोटी रुपये दिले होते. त्यांपैकी 43.6 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

गेल्या महिन्यातही याच प्रकरणात फारुख अब्दुल्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. त्या वेळी प्रकृतीचे कारण सांगून ते श्रीनगर येथील ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिले नव्हते. (ED Summons Farooq Abdullah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.