विखे पाटलांना साथ देणं Vijay Auti यांना भोवलं

163
विखे पाटलांना साथ देणं Vijay Auti यांना भौवलं 

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या उर्वरित तीन टप्प्यातील निवडणुका बाकी असून येत्या १ जून पर्यंत राज्यातील सर्व लोकसभा निवडणूक पूर्ण होतील. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरू असून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना विरोध करून सुजय विखेंना (Sujay Vikhe Patil) पाठिंबा देणं हे माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांना भोवलं आहे. विजय औटी यांना उबाठा गटातून निलंबित करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या दाव्याला मिळाला पुरावा; पाकिस्तानी सोशल मीडियातून राहुल गांधींचा होतोय उदोउदो)

अहमदनगर दक्षिण उबाठागटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे (UBT District Chief Shashikant Gade) यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र काढले आहे. विजय औटी यांनी मविआमध्ये असताना भाजपा  उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा दिल्याने नगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. 

पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषदेत घेत आम्ही सर्वजण महाविकास आघाडी सोबत म्हणजेच निलेश लंके यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं. त्यातच आता विजय औटी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आल आहे.

निलेश लंके आणि विजय औटी यांचा जुना संघर्ष

खरंतर विजय औटी आणि निलेश लंके यांच्यातील २०१९ पासूनचा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने बघितला आहे. विजय औटी हे शिवसेनेचे आमदार असताना निलेश लंके हे पारनेर शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे दोघांनी नेहमी एकमेकांना प्रतिस्पर्धीच्या रूपात पाहिले. (Vijay Auti)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.