Community Radio : भारतातील कम्युनिटी रेडिओची २० वर्षे साजरी

कम्युनिटी रेडिओचा प्रवास २००२ मध्ये सुरू झाला. त्यावेळी आयआयटीज तसेच आयआयएम्स यासारख्या काही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांना कम्युनिटी रेडिओ स्थानके सुरू करण्यासाठी परवाने देण्यासंदर्भातील धोरणाला भारत सरकारने मंजुरी दिली.

206
Community Radio : भारतातील कम्युनिटी रेडिओची २० वर्षे साजरी
Community Radio : भारतातील कम्युनिटी रेडिओची २० वर्षे साजरी

भारतातील कम्युनिटी रेडिओची २० वर्षे साजरी करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने १३ आणि १४ फेब्रुवारीला चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात कम्युनिटी रेडिओ संमेलन आयोजित करण्यात आला आहे. देशाच्या दक्षिण भागातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असलेली सर्व ११७ कम्युनिटी रेडिओ स्थानके या संमेलनात सहभागी होणार आहेत.

कम्युनिटी रेडिओचा प्रवास २००२ मध्ये सुरू झाला. त्यावेळी आयआयटीज तसेच आयआयएम्स यासारख्या काही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांना कम्युनिटी रेडिओ स्थानके सुरू करण्यासाठी परवाने देण्यासंदर्भातील धोरणाला भारत सरकारने मंजुरी दिली. ‘कम्युनिटी रेडिओ’ हा त्या समुदायाचे प्रतिनिधित्व करतो, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने नागरी संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांना नागरी समाजाशी संबंधित मुद्द्यांवर सहभागी होता यावे, याकरिता या संमेलनाचे आयोजन करण्यात येते.

(हेही वाचा – Mumbai Coastal Road चे इस्त्राईलच्या मंत्र्यांकडून कौतुक, म्हणाल्या…!)

१३ फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिनानिमित्त उद्घाटन…

आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी इत्यादी घटकांच्या संदर्भातील समस्या मांडण्यासाठी कम्युनिटी रेडिओ मंच पुरवते तसेच समाजातील वंचित घटकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे सशक्त माध्यम आहे तसेच भारतासारख्या देशात प्रत्येक राज्याची बोलीभाषा वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणाला वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. १३ फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिनानिमित्त कम्युनिटी रेडिओ हा सरकारी रेडिओ प्रसारण आणि व्यावसायिक रेडिओपासून वेगळा असणारा रेडिओ प्रसारणातील महत्त्वाचा तिसरा स्तंभ आहे.

कार्यरत कम्युनिटी रेडिओ
155 केंद्रांसह देशात कार्यरत कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्या आता 481 वर पोहोचली आहे.गेल्या 9 वर्षांमध्ये या क्षेत्राचा लक्षणीय विकास झाला असून वर्ष 2014 मध्ये कार्यरत असलेल्या 140 कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्या वाढून वर्ष 2023 मध्ये 481 पर्यंत वाढली आहे. भारतरत्न एल.के.अडवाणी यांनी 1 फेब्रुवारी 2004 रोजी भारतातील पहिल्या कम्युनिटी रेडिओ स्थानकाचे उद्घाटन केले. इतर समुदायाधारित संस्थांना देखील कम्युनिटी रेडिओ केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर, आधी कमी वेगाने सुरू झालेल्या या प्रवासाने चांगलीच गती घेतली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तसेच केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एन. मुरुगन उपस्थितांसमोर विशेष भाषण करणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.