Ashok Chavan : आजपासून राजकीय प्रवासाची नवीन सुरुवात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतील.

317
Congress अद्याप अशोक चव्हाण यांच्या धक्क्यात, Mahavikas Aghadi जागावाटप विसरले

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा आज मंगळवार १३ फेब्रुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी “ही माझ्या राजकीय प्रवासाची नवीन सुरुवात असल्याचे” सांगितले. (Ashok Chavan)

(हेही वाचा – Hemant Soren यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ)

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण ?

आजपासून मी (Ashok Chavan) माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मी (Ashok Chavan) आज भाजपमध्ये प्रवेश करेन. भाजपच्या प्रदेश कार्यालयात अन्य काही जिल्ह्यातील संभाव्य लोकांचे पक्षप्रवेश होतील. मात्र, मी आज काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलेले नाही, असे चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितले.

(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : जायबंदी के एल राहुल ऐवजी देवदत्त पडिकल भारतीय संघात)

चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार? 

राहुल नार्वेकर यांचा रविवारी (११ फेब्रुवारी) वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून (Ashok Chavan) सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असा जाणकारांचा अंदाज होता. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. कारण ते काँग्रेसमध्ये नाराज आहे, अशी चर्चा होती. (Ashok Chavan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.