Hemant Soren यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ

ईडीला संशय आहे की सोरेनने ट्रान्सफर पोस्टिंगमधूनही भरपूर कमाई केली आहे. यासंदर्भात तपास सुरू आहे. याशिवाय २०१ पानांच्या नवीन व्हॉट्सऍप चॅटमुळे हेमंत सोरेनच्या अडचणीही वाढणार आहेत.

117
Hemant Soren यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेमंत सोरेनच्या ४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

(हेही वाचा – Ashok Chavan आज भाजपमध्ये प्रवेश करणार)

हेमंत सोरेन तपासात सहकार्य करत नाही –

हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ५ दिवसांच्या रिमांडनंतर सोमवारी (१२ फेब्रुवारी) रांची येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. रिमांड कॉपीमध्ये हेमंत सोरेन तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीने केला आहे. हेमंत सोरेन यांना बिनोद सिंग यांच्यासोबतचे व्हॉट्सॲप चॅट दाखवण्यात आले होते, ज्यावर सोरेन यांनी सही करण्यास नकार दिला. तसेच त्याबाबतची वस्तुस्थितीही लपवून ठेवली. ईडीला संशय आहे की सोरेनने ट्रान्सफर पोस्टिंगमधूनही भरपूर कमाई केली आहे. यासंदर्भात तपास सुरू आहे. याशिवाय २०१ पानांच्या नवीन व्हॉट्सऍप चॅटमुळे हेमंत सोरेनच्या अडचणीही वाढणार आहेत. व्हॉटसएपवरील सोरेन आणि बिनोद सिंग यांनी ताब्यात घेतलेल्या जमिनीवर भविष्यातील व्यवसायाची योजना आखली होती.

(हेही वाचा – UP STF Halal Council : यूपी एसटीएफकडून हलाल कौन्सिल ऑफ इंडियाच्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक)

फोनचा तपशील देण्यास नकार –

विनोद सिंग यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या जमिनीवर बँक्वेट हॉल बांधण्यासाठी व्हॉट्सऍपवर नकाशाही पाठवला होता. ८.५ एकर ताब्यात घेतलेल्या जमिनीवर हा बँक्वेट हॉल बांधला जाणार होता. त्या जागेत कोणताही मोठा तुकडा शिल्लक नव्हता, त्यामुळे हेमंत सोरेन याने महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून ताब्यात घेतले होते. भानू प्रतापही सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे ईडी आता भानू प्रताप यांना पुन्हा हेमंत सोरेन यांच्यासमोर बसवून त्यांची चौकशी करण्याचा विचार करत आहे. हेमंत सोरेन यांना त्यांचा फोन नंबर विचारला असता त्यांनी फोनचा तपशील देण्यास नकार दिला, ईडीला या फोनच्या व्हॉट्सऍप चॅटचे तपशील मिळाले आहेत. (Hemant Soren)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.