Sarojini Naidu : पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू

107
Sarojini Naidu : पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू
Sarojini Naidu : पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ साली हैद्राबादमध्ये राहणाऱ्या एका बंगाली कुटुंबात झाला. सरोजिनी चटोपाध्याय हे त्यांचे लग्नाआधीचे नाव होते. त्यांचे वडील अघोरी चटोपाध्याय हे ब्राह्मण असून हैदराबाद कॉलेजचे प्रोफेसर होते. त्यांनी एडनबर्ग विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी मिळवली होती. त्यांच्या आई बंगाली भाषेतून कविता लिहायच्या. त्यांनी आपले शिक्षण मद्रास येथून पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या कॅम्ब्रिज येथे गेल्या. १८९८ साली त्यांनी डॉक्टर गोविंदरुजुलू नायडू यांच्याशी लग्न केलं.

(हेही वाचा – UP STF Halal Council : यूपी एसटीएफकडून हलाल कौन्सिल ऑफ इंडियाच्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक)

सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांना आपल्या आईकडूनच कवितेचा वारसा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. त्या एक उत्कृष्ट कवयित्री होत्या. तसेच त्या राजकीय कार्यकर्त्याही होत्या. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँगेसच्या चळवळीमध्ये त्या सामील झाल्या. महिला मुक्ती, नागरी हक्क, तसेच त्या सम्राज्यवादविरोधी विचारांचे समर्थनही करायच्या. एवढेच नव्हे तर भरताच्या स्वातंत्रालढ्यात सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

१९२५ साली सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर पुढे १९४७ साली त्यांची भारताच्या राजवटीत पहिल्या महिला राज्यपाल या पदी नेमणूक करण्यात आली. सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांच्या कवितांमध्ये देशभक्ती, लहान मुलांच्या कविता, रोमँटिक कविता, शोकांतिका अशा सगळ्या विषयांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो.

(हेही वाचा – World Radio Day : दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो)

१९१२ साली प्रकाशित झालेला त्यांचा ‘इन द बाजार्स ऑफ हैदराबाद’ हा सर्वांत जास्त लोकप्रिय कवितासंग्रह होता. १९०४ सालापासून सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) या एक लोकप्रिय वक्त्या झाल्या होत्या. आपल्या व्याख्यानातून त्यांनी विशेषतः महिला मुक्ती आणि महिला शिक्षणाचा प्रचार केला. त्याकाळी त्यांना बहाल केलेले केसर-ऐ-हिंद हे सुवर्णपदक त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले.

सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) या अखिल भारतीय महिला परिषदेच्या फाऊंडर मेंबर होत्या. १९३० सालच्या दांडीयात्रेमध्ये गांधीजींना महिलांना सामील करून घ्यायचे नव्हते. पण त्यावेळेस सरोजिनी नायडू (Sarojini Naidu), कमलादेवी चटोपाध्याय, खुर्शेद नौरोजी आणि त्यांच्या सोबतच इतर महिला कार्यकर्त्यांनी गांधीजींचे मन वळवले. त्यावेळी गांधीजींना अटक झाल्यानंतर मोहिमेच्या नव्या नेत्या म्हणून सरोजिनी नायडू यांनी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन केले तेव्हा सरोजिनी यांना इतर आंदोलनकर्त्यांबरोबर तुरुंगात डांबण्यात आहे.

तेव्हा त्यांना एकवीस महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांनी भारताच्या स्वतंत्र्यलढ्यात रौलट कायदा, खिलाफत चळवळ, साबरमती करार आशा वेगवेगळ्या चळवळींमध्ये जनसमान्यांत काँग्रेसच्या धोरणांचा प्रचार केला. तसेच असहकार चळवळीतही त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता. होमरूल लीगच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कितीतरी व्याख्याने दिली होती. २ मार्च १९४९ साली हार्टअटॅकने सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांचा मृत्यू झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.