IPL 2024, Shashank Singh : पंजाबच्या विजयानंतर शशांक सिंगने दिली शाहरुख खानची पोझ 

IPL 2024, Shashank Singh : विशेष म्हणजे पंजाबने मिळवलेला विजयची शाहरुखचा संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होता 

121
IPL 2024, Shashank Singh : पंजाबच्या विजयानंतर शशांक सिंगने दिली शाहरुख खानची पोझ 
IPL 2024, Shashank Singh : पंजाबच्या विजयानंतर शशांक सिंगने दिली शाहरुख खानची पोझ 
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता विरुद्ध पंजाबच्या (IPL 2024, Shashank Singh) विजयात जिमी बेअरस्टो (Jimmy Bairstow) बरोबरच युवा शशांक सिंगनेही २८ चेंडूंत ६८ धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. या हंगामात शशांक चांगलाच फॉर्मात आहे. शशांकनेच रमणदीपच्या चेंडूवर पंजाबसाठी विजयी धाव घेतली. मग पंजाबने टी-२० मधील पाठलाग करतानाच्या सर्वाधिक विजयी धावसंख्येचा पल्ला गाठला. शशांकने २८ चेंडूंत ६८ धावा करताना ८ षटकार आणि २ चौकार ठोकले.

(हेही वाचा- Mumbai Pune Expressway : खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक घेतला पेट, ३६ प्रवाशी थोडक्यात बचावले)

त्यानंतर पंजाब संघाच्या ड्रेसिंग रुममधला एक व्हीडिओ पंजाब किंग्जच्या अधिकृत ट्विटर हँडलवरच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात शशांक सिंग शाहरुख खानची (Shah Rukh Khan) अजरामर दिलवाले दुल्हनिया पोझ घेताना दिसतोय. विशेष म्हणजे पंजाबने मिळवलेला विजयही कोलकाता म्हणजे शाहरुखच्या संघाविरुद्ध मिळवेला होता. (IPL 2024, Shashank Singh)

(हेही वाचा- IPL 2024, PBKS vs KKR : पंजाबने दुसऱ्या डावात २६२ धावा करत जिंकला सामना, फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले )

२६१ धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचा संघ सुरुवातीपासूनच आक्रमक होता. प्रभसिमरन (Prabhasimran) आणि जॉनी बेअरस्टो (Jimmy Bairstow) यांनी ९८ धावांची सलामी पंजाबला करून दिली. प्रभसिमरन २० चेंडूंत ५४ धावा करून बाद झाला. त्यानंतर बेअरस्टोने खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याला शशांक सिंगची दमदार साथ मिळाली. या सामन्यात टी-२० आणि आयपीएलमधील फलंदाजीचे अनेक विक्रम हे धुळीला मिळाले. (IPL 2024, Shashank Singh)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.