अनिल कपूरचा ‘नायक’ चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM Eknath Shinde म्हणाले…

119
अनिल कपूरचा 'नायक' चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM Eknath Shinde म्हणाले...
अनिल कपूरचा 'नायक' चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM Eknath Shinde म्हणाले...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनेता मनिष पॉल (Manish Paul) याच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. यादरम्यान मनिष पॉलने एकनाथ शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले. लहानपणी असणाऱ्या इच्छा तसंच मुंबई खड्डेमुक्त होणार का? अशा मुद्द्यांवर मनिष पॉलने एकनाथ शिंदेंचं मत जाणून घेतलं. तसेच, यावेळी मनिष पॉलने एकनाथ शिंदेंसह अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट ‘नायक’संबंधीही (Nayak) चर्चा केली.
चित्रपट हा चित्रपट असतो

एकनाथ शिंदे यांना त्यांच्या लहानपणीची स्वप्नं तसंच नायक चित्रपट पाहून मुख्यमंत्री होण्याची इच्छा झाली का? असा प्रश्न विचारला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “चित्रपट हा चित्रपट असतो, सत्यात असं काही होत नसतं, त्यामुळे असं काही नाही.” यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चित्रपटात अनिल कपूर ज्याप्रकारे निर्णय घेऊन सर्व समस्या सोडवतो ते आवडलं असल्याचं म्हटलं.

(हेही वाचा- Mumbai Local Update : मुंबईकरांसाठी अपडेट ; लोकलच्या तिन्हीं मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक ’)

जनतेची सेवा करणं मला आधीपासून आवडतं

“मी शाखाप्रमुख पदापासून माझी राजकीय आणि सामाजिक कारकिर्द सुरु केली. तेव्हापासून मी फार मेहनत घेत आहे. जे काम मी स्विकारतो किंवा करण्याचा विचार करतो, ते काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो. मी पूर्ण आत्मसमर्पण देऊन काम करत असतो. त्यात श्रद्धाही असते. त्यामुळे मी हे काम कधी होईल, मला माहिती आहे, हे पद हवं आहे असा विचार केला नाही. मी काम करत गेलो आणि जनतेची सेवा करणं मला आधीपासून आवडतं. माझे गुरु आनंद दिघे यांच्यासह मी काम केलं असून, जनता आणि त्यांची सेवा याची मला आवड आहे.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.