Mumbai Local Update : मुंबईकरांसाठी अपडेट ; लोकलच्या तिन्हीं मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक ’

पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करण्यासाठी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

579
Mumbai Local Update : मुंबईकरांसाठी अपडेट ; लोकलच्या तिन्हीं मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक ’

मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उद्या मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० पर्यंत आणि चुनाभट्टी-वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. (Mumbai Local Update)

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

(Central Railway)

स्थानक- ठाणे ते कल्याण

मार्ग- अप आणि डाउन धीमा

वेळ- सकाळी ११ ते दुपारी ४

परिणाम- ब्लॉक कालावधीत ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावरील अप-डाउन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल २५ मिनिटे विलंबाने धावतील.  (Mumbai Local Update)

हार्बर रेल्वे

(Harbor Railway)

स्थानक- सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे

मार्ग- अप आणि डाउन

वेळ- सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

परिणाम- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी आणि सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगावसाठी धावणाऱ्या अप-डाउन लोकल बंद राहणार आहेत. फलाट क्रमांक ८ वरून पनवेल ते कुर्ल्यादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. (Mumbai Local Update)

पश्चिम रेल्वे

(Western Railway)

स्थानक- वसई रोड

मार्ग- अप आणि डाउन दिवा

वेळ- शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते रविवारी पहाटे ३.१५

परिणाम- वसई रोड यार्डातील रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. (Mumbai Local Update)

 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.