IPL 2024 PBKS vs KKR : श्रेयस अय्यर बाद झाल्यावर लहानग्या अबराम खानची प्रतिक्रिया व्हायरल

IPL 2024 PBKS vs KKR : कोलकाता संघाने २६१ धावा करूनही पंजाबने त्यांचा ८ गडी राखून पराभव केला. 

277
IPL 2024 PBKS vs KKR : श्रेयस अय्यर बाद झाल्यावर लहानग्या अबराम खानची प्रतिक्रिया व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात शाहरुख खानचा मुलगा अबराम खानची एक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कोलकाताने या सामन्यात पहिली फलंदाजी करत ५ बाद २६१ अशी धावसंख्या रचली. पण, शेवटच्या षटकात श्रेयर अय्यर बाद झाला ती गोष्ट लहानग्या अबरामला अजिबात रुचली नाही. (IPL 2024 PBKS vs KKR)

श्रेयसने तोपर्यंत १० चेंडूंत २८ धावा केल्या होत्या. तो बाद झाल्यावर अबरामने डोक्याला हात मारलेला दिसला. (IPL 2024 PBKS vs KKR)

(हेही वाचा – अनिल कपूरचा ‘नायक’ चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM Eknath Shinde म्हणाले…)

फिलिप सॉल्टच्या ७८ आणि सुनील नरेनच्या ७१ धावांच्या जोरावर या सामन्यात कोलकाताने ६ बाद २६१ ची मजल मारली. तर पंजाबसाठी अर्शदीप सिंगने ४५ धावांत दोन बळी मिळवले. कोलकाताचा या सामन्यात पराभव झाला असला तरी ८ सामन्यांत ५ विजय मिळवून त्यांचा संघ गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि पंजाबच्या संघाचा हा तिसरा विजय होता. त्यांचा संघ नवव्या स्थानावर आहे. (IPL 2024 PBKS vs KKR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.