APMC Market: अक्षय्य तृतीया निमित्त फळांच्या ‘राजाची’ आवक वाढली

आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते व अक्षय्य तृतीयेला आवकचा विक्रम होतो.

119
APMC Market: अक्षय्य तृतीया निमित्त फळांच्या ‘राजाची’ आवक वाढली

हिंदू सणात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiy) दिवशी अनेक जण सोने-चांदी, नवीन वस्तू, घर, वाहने खरेदी करतात. तसेच अक्षय्य तृतीयानिमित्त आंब्यांची (Hapus Mango) खरेदी ही मोठ्या प्रमाणात केली जाते. याच अनुषंगाने नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) आंब्यांची आवक वाढली आहे. कोकणातून ४७ हजार व इतर राज्यांतून ५३ हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली आहे. त्यामुळे हापूस आंबे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे दरदेखील घसरले आहेत.  (APMC Market)

(हेही वाचा – औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका Bombay High Court फेटाळली)

फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याला गुढीपाडवा (Gudhi Padhwa) तसेच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते. गत आठवड्यात आंब्याची आवक कमी झाली होती. बुधवारपर्यंत वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये १ लाख १ हजार तर मंगळवारी १ लाख १३ हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली आहे. तसेच दक्षिणेतील राज्यांमधून ५३,८४२ पेट्या आंबा विक्रीसाठी आला आहे.   (APMC Market)

(हेही वाचा – Pakistan : पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याकडून १०० मुलांचे लैंगिक शोषण)

यावेळी आंब्यांच्या दरात मोठी घसरण झाली असून, काही दिवसांपूर्वी ६०० ते १००० हजार रुपये डझनने विकला जाणरा हापूस हापूस आंबा यंदा मात्र २०० ते ५०० रुपये डझनने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आंब्याचे दर आल्याने यंदा अक्षय्य तृतीयेला अस्सल हापूसची चव चाखायला मिळणार आहे.  (APMC Market)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.