IPL 2024 Lucknow Jersey Changed? लखनौ सुपरजायंट्स संघाने जर्सीचा रंग का बदलला?

IPL 2024 Lucknow Jersey Changed? लखनौ संघाने कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी मरून रंगाची जर्सी परिधान केली होती. 

139
IPL 2024 Lucknow Jersey Changed? लखनौ सुपरजायंट्स संघाने जर्सीचा रंग का बदलला?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं मोठा विजय मिळवला. लखनौ सुपर जाएंटसनं पहिली फलंदाजी करताना १६१ धावा केल्या होत्या. हे आव्हान कोलकाता संधाने ८ गडी राखून पार केलं. कोलकाताच्या विजयात फिलीप सॉल्ट आणि श्रेयस अय्यरनं केलेल्या भागिदारीचं योगदान मोलाचं ठरलं. लखनौला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला आहे. पण, सामन्याच्या निकालाऐवजी आणखी एका गोष्टीची चर्चा सामन्यानंतर रंगली होती. संघाची जर्सी निळी असताना लखनौचा संघ त्या दिवशी लाल रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे की, संघाचा जर्सीचा रंग अचानक बदलला का? आणि इथून पुढे हाच रंग दिसणार का? पण, संघ प्रशासनाने यावर उत्तर दिलं आहे. (IPL 2024 Lucknow Jersey Changed?)

लखनौ सुपर जाएंटसची टीम आज ग्रीन अँड मरुन रंगाच्या जर्सीत पाहायला मिळाली. लखनौनं अचानक जर्सीचा रंग का बदलला असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. खरंतर लखनौ सुपर जाएंटसनं आयपीएलमध्ये पहिल्यांदा २०२२ पदार्पण केलं होतं. लखनौची टीम त्यावेळी अॅक्वा रंगाच्या जर्सीमध्ये दिसली होती. त्यानंतर म्हणजेच २०२३ च्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटस निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसून आली होती. मात्र एका मॅचमध्ये लखनौची टीम मरुन अँड ग्रीन रंगाच्या जर्सीत मॅच खेळताना दिसून आली होती. गेल्यावेळी जे घडलं होतं तसंच यावेळी देखील घडलं आहे. केकेआर विरुद्धच्या मॅचमध्ये लखनौची टीम ग्रीन अँड मरुन जर्सीत दिसून आली. (IPL 2024 Lucknow Jersey Changed?)

(हेही वाचा – IPL 2024, Punjab Kings : पंजाब किंग्ज संघाचा उपकर्णधार नेमका कोण? जितेश शर्मा की सॅम करन?)

यासाठी बदलण्यात आला जर्सीचा रंग 

लखनौ सुपर जाएंटसच्या टीमची मालकी आरपीएसजी ग्रुपकडे आहे. या ग्रुपकडे मोहन बागान एथलेटिक क्लबची देखील मालकी आहे. २०२३ मध्ये याच्या नावात बदल करुन मोहन बागान सुपर जाएंटस असं करण्यात आलं आहे. आरपीएसजी ग्रुपची रायजिंग पुणे सुपरजाएंटस ही टीम आयपीएल खेळलेली होती. पुण्याच्या टीमचा आयपीएलच्या दोन स्पर्धांमध्ये सहभाग होता. मोहन बागानला सपोर्ट करण्यासाठी लखनौ सुपर जाएंटस ग्रीन अँड मरुन रंगाची जर्सी घालतात. (IPL 2024 Lucknow Jersey Changed?)

१८८९ मध्ये स्थापन झालेला मोहन बागान भारतातील सर्वात जुना फुटबॉल क्लब आहे. हा क्लब कोलकातामध्ये क्रिकेटला पाठिंबा देतो, मात्र याची मालकी आरपीएसजी ग्रुपकडे आहे. त्यामुळं लखनौ सुपर जाएंटसला देखील समर्थन मिळवण्यासाठी जर्सीचा रंग बदलण्यात आला होता. दरम्यान, या पराभवानंतर लखनौ सुपर जाएंटसची गुणतालिकेत घसरण झालेली आहे. सहापैकी तीन मॅचमध्ये पराभव आणि तीन मॅचमध्ये विजय यासह ६ गुणांच्या जोरावर लखनौ आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. (IPL 2024 Lucknow Jersey Changed?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.