Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये 13 जागांसाठी चौरंगी मुकाबला; शिअद-भाजपा पहिल्यांदाच स्वतंत्र लढणार

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आल्यामुळे पंजाबमध्ये प्रचार करणे अवघड जाणार आहे. भ्रष्टाचार संपविण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले केजरीवाल स्वतः भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत.

84
Lok Sabha Election 2024 : 'या' 16 जणांची टीम वाढवणार मतदानाचा टक्का...कोण आहेत 'ते' 16 जण? वाचा...
  • वंदना बर्वे

पंजाबमधील 13 जागांसाठी चार मुख्य पक्ष मैदानात आहेत. मात्र खरा मुकाबला काँग्रेस आणि आम आदमी पक्षात होणे आहे. तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष या वेळी उत्तम प्रदर्शन करण्याच्या मूडमध्ये आहे. 117 सदस्यांच्या पंजाब विधानसभेत सध्या आपचे 92 आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसचे 18, शिरोमणी अकाली दल चार, भाजपा दोन आणि एक अपक्ष आमदार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आल्यामुळे पंजाबमध्ये प्रचार करणे अवघड जाणार आहे. भ्रष्टाचार संपविण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले केजरीवाल स्वतः भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत.

पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी शेवटच्या सातव्या फेजमध्ये अर्थात 1 जून रोजी मतदान होणार आहे. पंजाबच्या निवडणुकीला अद्याप उशीर असला, तरी पंजाबमधील निवडणुकीच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. पंजाबमध्ये या वेळी चौरंगी मुकाबला होणार आहे. आप, शिअद, काँग्रेस आणि भाजपा हे चारही पक्ष मैदानात असले, तरी मुख्य मुकाबला आम आणि काँग्रेसमध्ये होणार आहे.

(हेही वाचा – Abhijeet Bichukle: उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात)

शिअद-भाजपाची युती नाही

भारतीय जनता पक्ष पंजाबमध्ये नेहमीच शिअदसोबत युती करून निवडणुकीला सामोरे जात आला आहे. परंतु, यावेळी शिअद-भाजपाची युती नाही. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. खरं सांगायचं म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या योजना आणि मोदी यांचा दूरदृष्टीपणा पुढे ठेऊन भाजपा (BJP) निवडणुकीला सामोरे जात आहे.

पंजाबमधील लोकांचा शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेसपासून आधीच मोहभंग झाला होता. यामुळे लोकांनी आपच्या हातात राज्याची धुरा दिली. परंतु, मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या सरकारने काँग्रेसलाही मागे टाकले. अशात, पंजाबची जनता एक नवीन पर्याय म्हणून भाजपाची (BJP) निवड करू शकते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार)

2027 मध्ये होणाऱ्या विधानसभेवर डोळा

आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये चार राज्यांत समझोता झाला आहे. मात्र, आपने पंजाबमध्ये काँग्रेसशी समझोता केला नाही. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत चार पक्ष बाजी मारण्यासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळणार आहे. पंजाबमधील 13 जागांची ही निवडणूक फक्त लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) डोळ्यापुढे ठेवून लढली जाणार आहे, असे अजिबात नव्हे तर चारही पक्षाचा खरा डोळा आहे तो 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर.

यावेळची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अनेक अर्थांनी वेगळी असणार आहे. पंजाबमध्ये सत्तेत असताना आम आदमी पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. शिअद आणि भाजपाही (BJP) स्वतंत्र लढणार आहे. शिअद आणि बसपाची युती सुध्दा तुटली आहे.

(हेही वाचा – RamMandir: अयोध्येतील सोहळ्यानंतर राज्यातील श्रीराम मंदिरांच्या पात्रात दीडपट दान)

शिअदमध्ये सरदार प्रकाशसिंग बादल यांची कमी

महत्वाची आणखी एक बाब म्हणजे, सरदार प्रकाशसिंग बादल यांच्याशिवाय शिअद पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. शिअदने यापूर्वी एसएडी (युनायटेड) चे स्वत:च्या पक्षात विलीनीकरण करून घेतले आहे. याचा अर्थ असा की, शिअद आता सर्वांना सोबत घेवून चालण्याच्या मूडमध्ये आहे.

दुसरीकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) तेरापैकी आठ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमध्ये अनेक चेहरे बदलले आहेत. विशेष म्हणजे चंदीगड आणि हरियाणामध्ये लाट निर्माण करणारे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पंजाबमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, तेही मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून. अशा स्थितीत यावेळची पंजाबच्या नेतृत्वाची लोकसभेची लढत रंजक असणार आहे.

(हेही वाचा – South Mumbai Lok Sabha Constituency : लोढा तयार, प्रतीक्षा घोषणेची)

सत्तेत असताना आपची ही पहिलीच निवडणूक

आपने यापूर्वी 2014 आणि 2019 अशा लोकसभेच्या दोन्ही निवडणुकात पंजाबमध्ये उमेदवार उतरविले होते. परंतु, राज्याच्या सत्तेत असताना आपची ही पहिलीच निवडणूक असेल. यामुळे आपचा सर्व 13 जागांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. भाजपा (BJP) हा पंजाब आणि शेतकरी विरोधी पक्ष आहे. आणि त्याला शिअदची साथ आहे, असा आरोप करून मुख्यमंत्री मान यांनी वातावरण निर्मितीचा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग आणि विरोधी पक्षनेते प्रताप बाजवा यांनी पंजाबमध्ये आपसोबत आघाडी करण्यास स्पष्ट विरोध दर्शविला होता. आघाडी झाली तर काँग्रेसचा कार्यकर्ता हताश झाल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव दोन्ही नेत्यांनी हायकमांडला करून दिली होती.

(हेही वाचा – CRIME: नवरदेवाने लग्नाच्याच दिवशी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या, लग्नमंडपात शोककळा)

भाजपाने घोषित केले 6 उमेदवार

भाजपाने आतापर्यंत सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात काँग्रेससोडून आलेले रवनीत सिंग बिट्टू (लुधियाना) परनित कौर (पटियाला), आपमधून आलेले लोकसभा खासदार सुशील कुमार रिंकू (जालंधर), दिनेश सिंग बब्बू (गुरुदासपूर), हसं राज हंस (फरीदकोट) आणि अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरनजीत सिंग संधू (अमृतसर) येथून उमेदवारी दिली आहे. अभिनेता सनी देओल याला तिकीट नाकारण्यात आली आहे. स्थानिक जनतेशी त्यांचा अजिबात संपर्क नसल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली हे येथे विशेष.

आपचे 8 उमेदवार रिंगणात

आम आदमी पक्षाने पाच मंत्र्यांसह आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. लोकसभेचे तिकीट मिळालेल्या मंत्र्यांमध्ये अमृतसरमधून कुलदीप सिंग धालीवाल, खांडूर साहिबमधून लालजीत सिंग भुल्लर, संगरूरमधून गुरमीत सिंग मीत हैर आणि पटियालामधून डॉ. बलबीर सिंग यांचा समावेश आहे.

याशिवाय जालंधरचे विद्यमान खासदार सुशील कुमार रिंकू यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु आता ते भाजपाच्या तिकिटावर लढणार आहेत. भटिंडातून गुरमीत सिंग खुदियान, फतेहगढ साहिबमधून गुरप्रीत सिंग आणि फरीदकोटमधून करमजीत अनमोल यांना मैदानात उतरविले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.