RamMandir: अयोध्येतील सोहळ्यानंतर राज्यातील श्रीराम मंदिरांच्या पात्रात दीडपट दान

95
Ram Navami 2024 : जय श्रीराम... जाणून घेऊया राम जन्माची कथा...

२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरातील (RamMandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर राज्यभरातील राम मंदिरांमधील भाविकांच्या गर्दीत वाढ झाली असून राम मंदिरांच्या दानपात्रात दुप्पट दान संकलित झाले आहे. सन २०२३ मध्ये जानेवारी-फेब्रुवारी – मार्च या तीन महिन्यात प्रमुख १० राम मंदिरांच्या दानपात्रात सुमारे ५४ लाख दान पडले होते. जानेवारी २०२४ नंतरच्या तीन महिन्यांत ते दीडपटीने वाढून ७९ लाखांच्या घरात गेले आहे. (RamMandir)

(हेही वाचा –Heat wave: मुंबईकरांची काहिली; मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट)

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (RamMandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळारामाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर या मंदिरात (RamMandir) येणाऱ्या भाविकांची संख्या दुप्पट झाली आहे. पूर्वी मंदिरात महिन्याला सरासरी ४० ते ६० हजार भाविक दर्शनासाठी येत. मोदींच्या दौऱ्यानंतर ही संख्या ७० ते ८० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे मंदिराच्या दानपात्रातील रक्कमही दुप्पट झाली आहे. (RamMandir)

(हेही वाचा –Heat wave: पक्ष्यांनाही उष्माघाताचा त्रास! १६ दिवसात १०० हून अधिक पक्षी, प्राणी रुग्णालयात दाखल)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळाराम दर्शनानंतर (Kalaram Temple) देशभरातून काळारामाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. पूर्वी फक्त रामजन्मोत्सवासारख्या प्रसंगी या मंदिरात गर्दी दिसत होती. आता मात्र येथे दैनंदिन भाविकांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या नियोजनासाठी सुरक्षा रक्षकासह बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. फक्त सामान्य भक्तच नाही तर काळारामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची संख्याही वाढली आहे. (RamMandir)

(हेही वाचा –Supreme Court : घड्याळाचे काटे उलटे फिरवू नका; मतपेटीच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावले)

रामनवमीनिमित्त (RamMandir) शिर्डीच्या साई मंदिरात तीनदिवसीय सोहळ्यास १६ एप्रिल रोजी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. मुख्य सोहळा १७ एप्रिल रोजी होत असून त्या दिवशी दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले राहणार आहे. नागपूरमध्येही तीन प्रमुख शोभायात्रा काढण्यात येतात. त्यातील चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. नाशिकचे श्री काळाराम मंदिर (Kalaram Temple) पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शसासाठी खुले राहील. दुपारी १२ वा. जन्मोत्सव होईल. ५०० किलो पंजिरीचे वाटप होणार आहे. (RamMandir)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.