Lok Sabha Election 2024 : ‘त्या’ पोस्ट हटवल्या; तरीही ‘एक्स’ला निवडणूक आयोगाचा आदेश अमान्य

Lok Sabha Election 2024 : यंदा सोशल मीडियावरही निवडणूक आयोगाची देखरेख असणार आहे. या आचारसंहितेचे पालन होत नसल्याने निवडणूक आयोगाने या पोस्ट्स हटवण्याचे आदेश एक्सला दिले.

124
Lok Sabha Election 2024 : 'त्या' पोस्ट हटवल्या; तरीही ‘एक्स’ला निवडणूक आयोगाचा आदेश अमान्य
Lok Sabha Election 2024 : 'त्या' पोस्ट हटवल्या; तरीही ‘एक्स’ला निवडणूक आयोगाचा आदेश अमान्य

आचारसंहितेचा भंग होत असल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने काही पोस्ट्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर एक्सने (X) राजकारणी, पक्ष आणि उमेदवारांचे राजकीय भाषण असलेल्या काही पोस्ट्स हटवल्या आहेत. परंतु निवडणूक आयोगाचा हा आदेश मान्य नसल्याचे एक्सने उघडपणे सांगितले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – GST : वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार)

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती. यावेळी सोशल मीडियावरही निवडणूक आयोगाची देखरेख असणार आहे. या आचारसंहितेचे पालन होत नसल्याने निवडणूक आयोगाने या पोस्ट्स हटवण्याचे आदेश एक्सला दिले.

राजकीय नेत्यांच्या पोस्ट हटवल्या

निवडणूक आयोगाने २ एप्रिल रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला आदेश दिले होते की, वायएसआरसीपी आणि तेलगू देसम पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराची पोस्ट काढून टाका. या पोस्टमुळे आचारसंहितेचा भंग होत असून या पोस्टद्वारे एखाद्याच्या खासगी जीवनावर टीका करण्यात आली आहे. अशाच प्रकारचे आदेश आपच्या नेत्यांसाठीही देण्यात आले होते. एक्सने आम आदमी पार्टी, YSRCP, तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्या पोस्ट एक्सने हटवल्या आहेत.

आम्ही या कृतींशी असहमत – एक्स

एक्सच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेअर्स (Global Government Affairs) टीमने याविषयी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, राजकारणी, राजकीय पक्ष आणि निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवार यांच्याकडून शेअर केलेले राजकीय भाषण असलेल्या पोस्टवर कारवाई करणे आवश्यक आहे. आदेशांचे पालन करून, आम्ही उर्वरित निवडणूक कालावधीसाठी या पोस्ट्स रोखून ठेवल्या आहेत; परंतु, आम्ही या कृतींशी असहमत आहोत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या पोस्ट्स आणि सर्वसाधारणपणे राजकीय भाषणापर्यंत विस्तारले पाहिजे असे आम्ही आमचं म्हणणं कायम ठेवतो.” (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.