South Mumbai Lok Sabha Constituency : लोढा तयार, प्रतीक्षा घोषणेची

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आजवर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे या पक्षाचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र २०१४ आणि सन २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि या निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत हे सलग दोनदा खासदार निवडून आलेले आहेत. (South Mumbai Lok Sabha Constituency)

189
South Mumbai Lok Sabha Constituency : लोढा तयार, प्रतीक्षा घोषणेची

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर, उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते यशवंत जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र राहुल नार्वेकर यांचं नाव आता मागे पडत चालले असून या मतदारसंघात मंगल प्रभात लोढा यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून रणनिती आखायला सुरुवात केली आहे. मात्र त्यांना प्रतीक्षा आहे ती अधिकृत घोषणेची. मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे यशवंत जाधव हेही ही जागा आपल्या पक्षाकडे आल्यास, स्वत: उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टिकोनातूनही यशवंत जाधव कामाला लागलेले पाहायला मिळत आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आजवर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे (BJP) या पक्षाचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र २०१४ आणि सन २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि या निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत हे सलग दोनदा खासदार निवडून आलेले आहेत. मात्र शिवसेना पक्षामध्येच आता उभी फूट पडलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मुख्य नेता असलेला शिवसेना पक्षच अधिकृत शिवसेना असल्याचा निकाल लागला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा खासदार असल्याने या जागेवर शिवसेनेने ही हक्क दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र शिवसेनेकडे असलेल्या दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि उत्तर-मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघांपैकी केवळ दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. परंतु उत्तर-पश्चिम मतदार संघात गजानन किर्तीकर यांच्या ऐवजी अन्य उमेदवाराच्या शोध सुरू आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – South Central Mumbai Lok Sabha Constituency : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच शेवाळेंचा प्रचारात जोर, देसाईंचा नाचतो भेटीगाठीकडे मोर)

उमेदवारी जाहीर झाल्यास लोढा लागणार प्रचाराला 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा ठोकलेला आहे. त्यामुळे या दक्षिण मुंबई मतदार संघात भाजपाच्यावतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू होती. परंतु त्यांच्या नावाला योग्य प्रतिसाद न मिळाला असल्याने या जागेवर अन्य उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या ऐवजी मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या नावाचा पर्याय भाजपाकडे आहे. त्यामुळे मंगल प्रभात लोढा यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्याचा विचार जवळपास निश्चित मानला जात आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी निवडणूक प्रचाराची रणनिती जवळपास निश्चित केली असल्याचेही माहिती मिळत आहे. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यास ते या प्रचाराला लागतील असे बोलले जात आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

मात्र दुसरीकडे ही जागा शिवसेनेची असल्यामुळे या विभाग प्रमुख आणि पक्षाचे उपनेते यशवंत जाधव यांनी आपली कंबर कसलेली आहे. जाधव यांनी या संपूर्ण मतदारसंघात आढावा, तसेच गाठी भेटी घेऊन एक प्रकारचे वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडल्यास यशवंत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही जागा भाजपाला मिळाल्यास लोढा यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. या जागेवर कोणता उमेदवार निवडून येईल याची चाचपणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लोढा की यशवंत जाधव की भाजपा की शिवसेना याबाबत जागा आणि उमेदवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ही चाचपणी अंतिम झाल्यानंतर या मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत तसेच उमेदवारी बाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून वर्तवली जात आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.