Baramati Loksabha Election: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासोबत ‘हे’ शरद पवार उतरले बारामतीच्या रिंगणात!

129
Baramati Loksabha Election: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासोबत 'हे' शरद पवार उतरले बारामतीच्या रिंगणात!
Baramati Loksabha Election: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासोबत 'हे' शरद पवार उतरले बारामतीच्या रिंगणात!

बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Election) आरोप प्रत्यारोप आणि पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळते आहे. मात्र आता या पवार विरुद्ध पवार लढाईत (Pawar Vs pawar) अजून एका पवारांची एंट्री झाली आहे. महत्वाचं म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असं या तिसऱ्या पवारांचं नाव आहे. बारामती लोकसभेत (Baramati Loksabha Election) नणंद विरुद्ध भावजय अशी लढत आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर महायुतीकडून सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिसरा उमेदवार आता शरद पवार असणार आहे. (Baramati Loksabha Election)

(हेही वाचा –Abhijeet Bichukle: उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात)

बारामती (Baramati Loksabha Election) लोकसभा मतदारसंघासाठी बघतोय रिक्षावाला नावाच्या संघटनेनं चार उमेदवारांची घोषणा केलेली आहे. यातील एका उमेदवाराचं नाव शरद पवार असं आहे. त्यामुळे या रिक्षाचालकाची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगत आहे. घटनेकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी १८ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, एसबीआय बँकेजवळ, चर्च रोड परिसरात दुपारी १२ वाजता प्रचारसभा घेतली जाणार आहे. त्यानंतर हे सगळे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Baramati Loksabha Election)

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

शरद पवार हे मुळचे बीडचे आहेत मात्र ते सध्या कात्रज- आंबेगाव परिसरात राहतात. सगळ्या प्रकारच्या कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी निवडणुकीच्या (Baramati Loksabha Election) रिंगणात उतरले असल्याचं ते म्हणाले. पुण्यात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी रिक्षा पर्मिटवर काम करणं गरजेचं आहे. अनेकांना रिक्षा पर्मिट दिलं जातं. त्यामुळे संख्या वाढते. यावर नियंत्रण आणणं महत्वाचं असल्याचं शरद पवार म्हणाले. (Baramati Loksabha Election)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.