IPL 2024, Punjab Kings : पंजाब किंग्ज संघाचा उपकर्णधार नेमका कोण? जितेश शर्मा की सॅम करन?

संघाने जितेशला फोटो-शूटला पाठवलं आणि प्रत्यक्ष मैदानात करनने केलं नेतृत्व

92
IPL 2024, Punjab Kings : पंजाब किंग्ज संघाचा उपकर्णधार नेमका कोण? जितेश शर्मा की सॅम करन?
IPL 2024, Punjab Kings : पंजाब किंग्ज संघाचा उपकर्णधार नेमका कोण? जितेश शर्मा की सॅम करन?
  • ऋजुता लुकतुके

पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने अखेरच्या षटकात पंजाब किंग्जला पराभूत केलं. पंजाब किंग्जला आयपीएलमधील (IPL 2024) चौथा पराभव स्वीकारावा लागला. राजस्थान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर पंजाब संदर्भात आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे शिखर धवनच्या गैरहजेरीत कर्णधार म्हणून संघाने सॅम करनला (Sam Karan) नेतृत्त्वाची संधी दिली गेल्यानं वादाला सुरुवात झाली होती. पंजाब किंग्जचा (Punjab Kings) उपकर्णधार जितेश शर्मा (Jitesh Sharma) असताना त्याला का डावललं गेलं, असा प्रश्न विचारण्यात येत होता. चर्चा वाढू लागताच अखेर पंजाब किंग्जकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

आयपीएलच्या (IPL 2024) सुरुवातीला सर्व संघांच्या कॅप्टनचं फोटोशूट करण्यात आलं होतं त्यावेळी शिखर धवनच्या जागी जितेश शर्मा (Jitesh Sharma) पंजाब किंग्जचं प्रतिनिधीत्व करताना दिसला होता. त्यानंतर जितेश शर्मा (Jitesh Sharma) संघांचा उपकर्णधार असल्याचं मानलं जात होतं. जितेश शर्माला शिखर धवन नसताना फोटोशूटसाठी पाठवलं गेलं होतं. त्या फोटो शूटचा दाखला देत पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) मॅनेजमेंटला प्रश्न विचारण्यात येत होते. पंजाब किंग्जच्या हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट संजय बांगर यांन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

(हेही वाचा – IPL 2024, RCB Playoff Chances : बंगळुरूला सलग ६ पराभवांनंतरही बाद फेरीची संधी आहे का?)

संजय बांगरनं म्हटलं की, जितेश शर्माला उपकॅप्टन करण्यात आलेलं नव्हतं. त्यावेळी स्पर्धेच्या सुरुवातीला सॅम कर्रनला (Sam Karan) भारतात येण्यासाठी उशीर झाला होता. त्यामुळं जितेश शर्माला (Jitesh Sharma) कॅप्टनच्या मिटींगसाठी पाठवलं गेलं होतं. सॅम करनला उशीर झाल्यानं त्याला ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हायचं होतं. त्यामुळे आयपीएलच्या (IPL 2024) उद्घाटनसाठी त्याला चेन्नईला पाठवण्यात आलं नव्हतं यामुळे जितेश शर्माला (Jitesh Sharma) तिकडे पाठवल्याचं संजय बांगर म्हणाले.

संजय बांगर म्हणाले की जितेश शर्माला कॅप्टनच्या फोटोशूटमध्ये पाठवलं होतं कारण आयपीएलच्या सदस्यांचे तसे निर्देश होते. टीमच्या किमान एका खेळाडूला तरी त्या फोटोशूटमध्ये सहभागी होणं अनिवार्य होतं. मात्र, लोक जितेश शर्माला (Jitesh Sharma) उपकर्णधार समजतील, असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. ज्यावेळी शिखर धवन उपलब्ध नसेल त्यावेळी सॅम करन (Sam Karan) हाच कॅप्टन म्हणून काम करेल, असा आमचा निर्णय झालेला होता, असं संजय बांगर म्हणाले.

(हेही वाचा – Supreme Court : घड्याळाचे काटे उलटे फिरवू नका; मतपेटीच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावले)

पंजाब किंग्जला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये ३ विकेटनी पराभव स्वीकारावा लागला. पंजाबनं पहिल्यांदा बॅटिंग करताना ८ विकेटवर १४७ धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जकडून (Punjab Kings) आशुतोष शर्मा आणि लियाम लिव्हिगस्टोननं जोरदार फलंदाजी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं अखेरच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सच्या हातून मॅच जाणार अशी स्थिती निर्माण झालेली असताना हेटमायरनं मॅच जिंकवून दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.