Navneet Rana : नवनीत राणा आणि रवी राणा अभिजीत अडसूळ यांच्या भेटीला; दिलजमाईचे प्रयत्न

Navneet Rana : नवनीत राणा आणि रवी राणा यांनी एकेकाळी कट्टर विरोधक असलेले अभिजीत अडसूळ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणनितीविषयी चर्चा केली.

105
Navneet Rana : नवनीत राणा आणि रवी राणा अभिजीत अडसूळ यांच्या भेटीला; दिलजमाईचे प्रयत्न
Navneet Rana : नवनीत राणा आणि रवी राणा अभिजीत अडसूळ यांच्या भेटीला; दिलजमाईचे प्रयत्न

अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचे पुत्र अभिजीत अडसूळ (Abhijeet Adsul) यांची भेट घेतली आहे. २०१९ मधील लोकसभा नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. यंदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून आता त्या महायुतीतील नेत्यांशी दिलजमाई होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

त्यामुळेच त्यांनी एकेकाळी कट्टर विरोधक असलेले अभिजीत अडसूळ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणनितीविषयी चर्चा केली.

(हेही वाचा – IPL 2024, Longest Six : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकचा स्पर्धेतील सगळ्यात लांब षटकार पाहिलात का?)

कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार – अभिजीत अडसूळ

राजकारणात कुणी कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. पाहुणे घरी आले की, त्यांचे आपण स्वागत करतो. तसेच स्वागत आम्ही नवनीत राणा आणि रवी राणा यांचे केले आहे. मात्र कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 400 पारचा नारा देण्यात आला आहे. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रित काम करणार आहोत, असे अभिजीत अडसूळ यांनी नवनीत आणि रवी राणा यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

आम्ही एकत्रित काम करणार – आमदार रवी राणा

महायुती मधील सर्व घटक पक्ष एकत्रित काम करतात. त्यामुळे आम्ही एकत्रित काम करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्या भेटीनंतर म्हटले आहे. ‘राम को लाये है, वैसे मोदीजी को लाना है’ असा नारा देत आमदार रवी राणा यांनी अभिजीत अडसूळ यांना दिलजमाईचे आवाहन केले. आम्ही सर्व एकत्र मिळून लढणार असल्याचे देखील रवी राणा यांनी सांगितले आहे.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा ?

ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायत सारखी लढवावी लागेल. आपले जेवढे मतदार आहेत ते सर्व बूथपर्यंत नेले पाहिजेत. जर कोणी फुग्यात राहत असेल की मोदींची हवा आहे. तर लक्षात ठेवा 2019 मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आले होते. एवढी मोठी यंत्रणा असूनही एक अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भ्रमात राहू नये, असे वक्तव्य नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले होते. त्यावरून टीका झाल्यावर त्यांनी सारवासारवही केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.