Maharashtrian Jewellery: महाराष्ट्रीयन दागिन्यांचा ‘हा’ इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

123
Maharashtrian Jewellery: महाराष्ट्रीयन दागिन्यांचा 'हा' इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
Maharashtrian Jewellery: महाराष्ट्रीयन दागिन्यांचा 'हा' इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

दागिने (Maharashtrian Jewellery) म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मीळ धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर हिरे बसवलेले असतात. प्राचीन भारतातील दागदागिने (Maharashtrian Jewellery) व अलंकार याबाबत सर्वप्रथम सिंधू संस्कृतीपासून माहिती मिळते. मोहेंजोदडो व हडप्पा येथील स्त्रीया व पुरुष यांना अलंकार परिधान करण्याची हौस असल्याचे दिसते. उत्खननात असे आढळुन आले की, स्त्रिया गळ्यात ताईत बांधीत, हार घालंत. दंडात बाजुबंद, कानात तुकड्यासारखी लटकती कर्णभुषे वापरीत. बांगड्या कोपरापर्यंत भरत. त्यांच्या कमरेला मेखला, बोटात अंगठ्या व पायात तोरड्या असत. याकाळातील श्रीमंतांचे दागिने (Maharashtrian Jewellery) सोने, चांदी, मणी यांचे व गरिबांचे दागिने हे तांबे, हाडे व शिंपा असत. (Maharashtrian Jewellery)

(हेही वाचा –Eastern and Western express highway वरील ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट बाळगळणार?)

दागिने (Maharashtrian Jewellery) हा हजारो वर्षांपासून मानवी इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. एखादा तसाच्या तसा दागिना तयार करायला खूप कौशल्य लागते. हे काम हाताने करावे लागते. टिकल्या पाडणे, तार तयार करणे, जोडकाम करणे, तासकाम करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून धातू जातो आणि मग दागिना (Maharashtrian Jewellery) घडतो. काही दागिने साच्यातून दाब देऊन बनवले जातात. सोन्याच्या पत्र्यावर ठसा उमटवूनही दागिने घडवले जातात. त्यावर जोडकाम, तासकाम आणि चमक आणणे यासारख्या प्रक्रिया हाताने केल्या जातात. (Maharashtrian Jewellery)

(हेही वाचा –PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?)

महाराष्ट्रीयन दागिन्यांचे प्रकार

गळ्यांतले दागिने : ठुशी, राणी हार, चिंचपेटी, कोल्हापुरी साज, बोरमाळ, पुतळी हार, मंगळसुत्र, मोहनमाळ

केसात घालायचे दागिने : फुले

कर्णालंकार : कुडी, कर्णफुले, झुमके, बाळी, वेल, बुगडी, कुडकं

पायातील दागिने : पैंजण

कमरेवरचे दागिने : मेखला, छल्ला

नाकातले दागिने : नथ

बाजूवरील दागिने : बाजूबंद, वाकी, नागबंद, नागोत्र, तोळेबंद, वेळा

मनगटातले दागिने : पाटल्या, बिलवर, गोठ, तोडे, गजरा, जवे

बोटातले दागिने : अंगठी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.