HSC Result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! बारावीचा निकाल जाहीर होणार

154
HSC Result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! बारावीचा निकाल जाहीर होणार
HSC Result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! बारावीचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) आज (२१ मे) जाहीर (HSC Result) केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. (HSC Result)

(हेही वाचा –National Education Policy: राज्यातील १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण)

बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येईल. यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या (HSC Result) परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. (HSC Result)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्राबाहेर कुठे गोंधळ आणि वादावाद)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC Exams) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. (HSC Result)

कुठे पाहता येणार निकाल?

mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.