Covishield Vaccine: कोविशिल्ड वॅक्सिनमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका, कंपनीने मान्य केली दुष्परिणामांची शक्यता

या लसीविरोधात अनेक लोकांनी न्यायालयात खटले दाखल केले होते.

392
Covishield Vaccine: कोविशिल्ड वॅक्सिनमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका, कंपनीने मान्य केली दुष्परिणामांची शक्यता
Covishield Vaccine: कोविशिल्ड वॅक्सिनमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका, कंपनीने मान्य केली दुष्परिणामांची शक्यता

कोविशिल्ड लसीचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, अशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. कंपनीने दुष्परिणामाची शक्यता असल्याचे मान्य केलं आहे. अनेकदा असे आरोप करण्यात आले होते; पण आता कंपनीच्या कबुलीमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. (Covishield Vaccine)

कोविशिल्ड लस उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने (AstraZeneca) एक मोठा खुलासा केला आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, कंपनीने पहिल्यांदाच कबूल केले आहे की, कोविड -19 लस कोविशिल्डमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. दरम्यान, अशा प्रकरणांची संख्या खूपच कमी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

(हेही वाचा –ICG- NCB- Gujarat ATS: भारतीय मासेमारी नौकेतून १७३ किलो चरस जप्त, २ खलाशी ताब्यात )

कोविशिल्ड लस उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने (AstraZeneca) एक मोठा खुलासा केला आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, कंपनीने पहिल्यांदाच कबूल केले आहे की, कोविड -19 लस कोविशिल्डमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. दरम्यान, अशा प्रकरणांची संख्या खूपच कमी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

लसीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचा आरोप
कोविशिल्ड लसीमुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लसीमुळे मृत्यूंसह अनेक गंभीर आजारांबाबत ॲस्ट्राझेनेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या लसीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लसीविरोधात न्यायालयात खटले
या लसीविरोधात अनेक लोकांनी न्यायालयात खटले दाखल केले होते. ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) लसीच्या दुष्परिणामांमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्याचा आरोप अनेकांनी केला होता. त्यामुळे आता कंपनीने या लसीच्या दुष्परिणामांची दिलेली कबुली खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे लसीकरणाचा संभाव्य धोका स्पष्ट होतो. याप्रकरणी जेमी स्कॉट यांनी खटला दाखल केला होता. त्याने एप्रिल 2021 मध्ये ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) लसीचा डोस घेतला, त्यानंतर त्यांच्या मेंदूवर कायमचा परिणाम झाla आहे.

लसीमुळे नेमके काय दुष्परिणाम होतात?
जेमी स्कॉटसह इतर रुग्णांच्या प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) सोबत थ्रोम्बोसिस नावाचा एक दुर्मिळ दुष्परिणाम दिसून आला आहे. ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीने ब्रिटन (UK) उच्च न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की, या लसीमुळे TTS सारखे दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु याची शक्यता फारच कमी आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.