IPL 2024, DC vs GT : रागावलेल्या कुलदीप यादवला कर्णधार रिषभ पंतने कसं आवरलं?

IPL 2024, DC vs GT : मुकेश कुमारने फेकलेला चेंडू कुलदीपच्या हातावर बसल्यामुळे कुलदीप संघ सहकाऱ्यावरच चिडला होता

128
IPL 2024, DC vs GT : रागावलेल्या कुलदीप यादवला कर्णधार रिषभ पंतने कसं आवरलं?
IPL 2024, DC vs GT : रागावलेल्या कुलदीप यादवला कर्णधार रिषभ पंतने कसं आवरलं?
  • ऋजुता लुकतुके

जीवघेण्या अपघातानंतर दुखापतीतून सावरलेला रिषभ पंत (Rishabh Pant) यंदा आयपीएलच्या माध्यमातून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. विशेष म्हणजे दीड वर्षांनंतर मैदानात उतरलेला पंत फलंदाजीत चांगली कामगिरी करतोय. त्याला चांगली लयही सापडलीय. तर कप्तान म्हणून तो किती सक्षण आहे याची झलक गुजरात विरुद्धच्या सामन्यात दिसली. कप्तानाला खेळाडूंना जिंकण्यासाठी प्रोत्साहित करणं, गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना अशा गोष्टी मैदानात प्रामुख्याने कराव्या लागतात. यात आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे संघातील वातावरण चांगलं ठेवणं. (IPL 2024, DC vs GT)

(हेही वाचा- Narayan Rane : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वेडे झालेत; नारायण राणेंची बोचरी टीका)

बुधवारी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि मुकेश कुमार (Mukesh Kumar) यांच्यात मैदानातच रंगलेली बोलाचाली यष्टीमधील कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे चिडलेल्या कुलदीपला शांत करण्यासाठी रिषभ पंतला (Rishabh Pant) मध्ये पडावं लागलं. पण, त्याने ही परिस्थितीही नीट हाताळली. (IPL 2024, DC vs GT)

मुकेश कुमारने पॉइंट वरून फेकलेला चेंडू कुलदीप यादवच्या हातावर जोरात बसला. त्यामुळे कुलदीप यादव (Kuldeep Yadav) एकदम चिडला. ‘पागल, वागल है क्या?’ असं कुलदीपने मुकेशला म्हटलंही. कारण, कुलदीपच्या मते चेंडू इतक्या वेगाने टाकण्याची गरज नव्हती. त्यामुळे कुलदीप मुकेशवर चिडला. पण, रिषभ पंतने, ‘गुस्सा नही, गुस्सा नही,’ असं म्हणत चिडलेल्या कुलदीपला शांत केलं. मैदानावरील असभ्य वर्तनासाठीची कुलदीपवरील कारवाईही रिषभने आपल्या प्रसंगावधानानो टाळली. (IPL 2024, DC vs GT)

(हेही वाचा- IPL 2024, DC vs GT : गुजरातला ८९ धावांत गुंडाळल्यावर दिल्लीचा ६ गडी राखून विजय )

सामन्यांत गुजरात टायटन्सचा (GT) दिल्ली कॅपिटल्सक़डून (DC) ६ गडी राखून पराभव झाला. पहिली फलंदाजी करताना गुजरातचा ८९ धावांमध्येच धुव्वा उडाला. मग दिल्लीने नवव्या षटकांत ९४ धावा करत ६ गडी राखून विजय मिळवला. दुखापतीनंतर दीड महिन्यांनी स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असला तरी रिषभ चांगली कामगिरी करतोय. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातही तो यष्टीरक्षक फलंदाज पदासाठी मुख्य दावेदार आहे. (IPL 2024, DC vs GT)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.