Salman Khan: सलमान खान हल्ला प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

अनुज थापन याने सलमान खान हल्ला प्रकरणात हल्लेखोरांना पिस्तुल आणि काडतुसे पुरवली होती.

134
Salman Khan: सलमान खान हल्ला प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनुज थापन याने मुंबई पोलीस मुख्यालयात असलेल्या पोलीस कोठडीत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी, (१ मे) दुपारी उघडकीस आली आहे. (Salman Khan)

सलमान खान (Salman Khan) हल्ला प्रकरणात गुजरात पोलिसांनी २ हल्लेखोरासह ४ जणांना अटक केली. मागील आठवड्यात कक्ष ९ ने पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या सोनू चंदर आणि अनुज थापन यांच्यासह ४ आरोपी गुन्हे शाखेच्या लॉकअप मध्ये होते. हे लॉकअप मुंबई पोलीस मुख्यालयात आहे. ४ आरोपींपैकी सोनू चंदर याला वैद्यकीय कारणामुळे न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. उर्वरित तिघांना ८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून या तिघांना गुन्हे शाखेच्या लॉकअप ठेवण्यात आले आहे. या तिघांपैकी अनुप कुमार थापन याने बुधवारी, (१ मे) सकाळी लॉकअपमध्ये गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच लॉकअप ड्युटीला असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ ही बाब वरिष्ठांना कळवले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे अनुपला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल केले होते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज थापन याने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अनुज थापन याने सलमान खान हल्ला प्रकरणात हल्लेखोरांना पिस्तुल आणि काडतुसे पुरवली होती. मुंबई गुन्हे शाखेने नुकतीच लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या चौघांवर तसेच लॉरेन्स बिष्णोई आणि अनमोल बिष्णोई विरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई सुरू केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.