Lok Sabha Election 2024: शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर

129
Lok Sabha Election 2024: शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर

शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा सामान ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे. हेमंत गोडसे यांनी शिवसेनेकडून लढताना २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत नाशिकमधून विजय मिळवला होता. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते ठाकरे गटात गेले होते. आता पुन्हा एकला लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा बाजी मारून येथे विजयाची हॅटट्रिक करण्याचा गोडसे यांचा प्रयत्न असेल. (Lok Sabha Election 2024)

WhatsApp Image 2024 05 01 at 13.13.43

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून महायुतीमध्ये शिवसेना पक्षाकडे असलेल्या काही मतदारसंघांवरून तिढा निर्माण झालेला होता. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. या मतदारसंघातून भाजपा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, नाशिक दौऱ्यावर गेलेल्या श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यावरून महायुतीमध्ये नाराजी निर्माण झाली होती तसेच हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली होती.

(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीला शाहरुख खान म्हणाला, ‘बॉलिवूडचा जावई’)

अधिकृत घोषणा…
त्यानंतर नाशिकमधून महायुती छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, मात्र शिंदे गटाने या मतदारसंघावरील आपला दावा ठाम ठेवला होता. अखेरीस भुजबळ यांनी उमेदवारीच्या शर्यतीमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हेमंत गोडसे यांचं नाव पुन्हा एकदा शर्यतीत आलं होतं तसेच बुधवारी (१ मे) शिंदे गटाकडून त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.