IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीला शाहरुख खान म्हणाला, ‘बॉलिवूडचा जावई’

अलीकडेच एका मुलाखतीत शाहरुखने विराट आणि त्याच्यातील नात्याचे पैलू उधड केले

95
IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीला शाहरुख खान म्हणाला, ‘बॉलिवूडचा जावई’
IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीला शाहरुख खान म्हणाला, ‘बॉलिवूडचा जावई’
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खानने विराट कोहलीचं (Virat Kohli) कौतुक करताना त्याला ‘बॉलिवूडचा जावई’ म्हटलं आहे. ‘मला खरंच तो खूप आवडतो,’ असंही शाहरुख म्हणाला. विराट आणि अनुष्काला त्यांच्या लग्नापूर्वीपासून ओळखत असल्याचं शाहरुखने आवर्जून सांगितलं. ‘दोघांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा मी अनुष्काबरोबर एका चित्रपटाचं चित्रिकरण करत होतो. तेव्हा आम्ही बराच काळ एकत्र घालवला आहे. आणि भरपूर गप्पा मारल्या आहेत,’ असं गुपित शाहरुख खानने उघड केलं.

(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : विराट कोहली फिरकीला खेळताना खरंच अडखळतोय का?)

विराटची पत्नी अनुष्का शर्माबरोबर शाहरुखने ‘रबने बनादी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ असे दोन महत्त्वाचे सिनेमे केले आहेत. आणि त्या दरम्यान अनुष्का आणि विराटशी मैत्री झाल्याची आठवण शाहरुख खान सांगतो. दोघांच्या लग्नालाही शाहरुख खान पूर्णवेळ हजर होता. तिघांनी ऑन-स्क्रीन काही जाहिराती एकत्र केल्या आहेत. पण, स्क्रीन बाहेरची एक आठवण शाहरुख आवर्जून सांगतो. ‘विराटचा मैदानावरील एक व्हीडिओ अलीकडे व्हायरल झाला होता. त्यात तो मैदानावर प्रेक्षकांसाठी पठाण सिनेमातील गाण्यावर नाच करत होता. पण, तो स्टेप्स नीट करत नव्हता. मी त्याला घरी बोलावलं. आणि त्याला तो नाच शिकवला,’ अशी मजेशीर आठवण शाहरुखने सांगितली. (IPL 2024)

इतकंच नाही तर इतर कुठल्याही स्टेप्स त्याला शिकवण्याची तयारी शाहरुख खानने दाखवली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024)  कोलकाता नाईट रायडर्स संघाने बंगळुरूचा एका धावेनं निसटता पराभव केला होता. कोलकाताने त्या सामन्यात ५ बाद २६८ अशी धावसंख्या उभारली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.