Devendra Fadnavis: अहंकार आणि अतिमहत्त्वाकांक्षा हेच पक्षफुटीचे एकमेव कारण, फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

106
Lok Sabha Election 2024: निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे 'विशेष लक्ष' देणार - देवेंद्र फडणवीस

अहंकार आणि अतिमहत्त्वाकांक्षा या एकमेव कारणामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. (Devendra Fadnavis)

दोन पक्ष विभाजित झालेले दिसतात याचं एकमेव कारण म्हणजे, अहंकार आणि अतिमहत्त्वाकांक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात कुणी केली? वसंतदादा पाटील यांच्याच सरकारमध्ये राहून त्यांचेच सरकार पाडण्याचे काम कुणी केले? ज्यावेळी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते. त्यावेळी त्यांचा पक्ष फोडून त्यांना दु:ख देण्याचे काम कुणी केले? हे सगळ्यांना स्पष्टपणे माहीत आहे. खोके, ओके, तोडले-फोडले या घोषणांचा काही परिणाम होणार नाही,’ असे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – Air Travel Expensive: इंधन दरवाढीमुळे विमानाचा प्रवास महागला, १ मेपासून नवीन दर लागू)

बाळासाहेब ठाकरेंचे विचार बासनात गुंडाळले
उद्धव ठाकरेंना अहंकार होताच, ते आमच्याबरोबर होते तेव्हाही रोज मोदींवर शेलक्या शब्दांत बोलायचे, लिहायचे हे त्यांनी केले, कारण तो त्यांचा अहंकार होता तसेच मुख्यमंत्रीपदाची लालसा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे असते, तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू शकत होते. शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचे नव्हते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. संधी मिळाली तशी त्यांनी विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेब ठाकरेंचे विचार बासनात गुंडाळले आणि सरकार स्थापन केलं. हीच त्यांची अति महत्त्वाकांक्षा पक्ष विभाजीत होण्यासाठी कारणीभूत ठरली, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.