IPL 2024, Harshit Rana Fine : हर्षित राणावर एका सामन्याची बंदी

बंदी बरोबरच त्याचं एका सामन्याचं मानधनही कापण्यात येणार आहे

122
India Tour of Sri Lanka : हर्षित राणाचा भारतीय क्रिकेट संघात समावेश कसा झाला?
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्सच्या हर्षित राणावर (Harshit Rana) सोमवारच्या सामन्यातील वागणुकीसाठी एका सामन्याची बंदी आणि संपूर्ण मानधन कापण्याची कारवाई झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात हर्षित राणाने (Harshit Rana) दिल्लीच्या अभिषेक पोरेलचा एका पूर्ण टप्प्याच्या चेंडूवर त्रिफळा उडवला. आणि या बळीचा आनंद साजरा करताना त्याने फलंदाजाकडे बघून तंबूत परत जा असं म्हणणारे जे हावभाव केले ते आक्षेपार्ह असल्याचं सामनाधिकाऱ्यांचं मत पडलं आहे. त्याने फलंदाजाला विरहाच्या वेळी देतात तसा फ्लाईंग किस दिला.

विशेष म्हणजे यापूर्वीही कोलकाता संघाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात हर्षितवर अशीच कारवाई झाली होती. तेव्हा सनरायझर्स हैद्राबादचा फलंदाज मयंक अगरवालला हर्षितने असेच हावभाव करून डिवचलं होतं. तेव्हा त्याचा हा पहिलाच अपराध असल्याने त्याच्या मानधनातून ६० टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती.

(हेही वाचा – Air Travel Expensive: इंधन दरवाढीमुळे विमानाचा प्रवास महागला, १ मेपासून नवीन दर लागू)

पण, यावेळी दुसरा अपराध असल्यामुळे त्याची तीव्रता नियमाप्रमाणे वाढली आहे. आणि संपूर्ण मानधन कापून घेण्याबरोबरच त्याच्यावर एका आयपीएल सामन्याची बंदीही लादण्यात आली आहे. ‘राणाकडून आयपीएलच्या (IPL 2024) नियमावलीतील २.५ कलमाचा भंग झाला आहे. त्याचा हा पहिल्या स्तराचा गुन्हा आहे. आणि सामनाधिकाऱ्यांचा निर्णय या बाबतीत अखेरचा असतो. त्यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत हर्षितने अपराध मान्य केला आहे. त्यामुळे याविषयी पुढे सुनावणीची आवश्यकता नाही,’ असं आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

या हंगामात एखाद्या खेळाडूवर झालेली ही पहिलीच कठोर कारवाई आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.