Loksabha Election 2024 : उच्चभ्रू वस्तीत मतदानाबाबत उदासीनता; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आयोगाकडून उपाययोजना

96
Loksabha Election 2024 : उच्चभ्रू वस्तीत मतदानाबाबत उदासीनता; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आयोगाकडून उपाययोजना
Loksabha Election 2024 : उच्चभ्रू वस्तीत मतदानाबाबत उदासीनता; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आयोगाकडून उपाययोजना

लोकशाहीमध्ये मतदान हा सर्वांचा मूलभूत आणि सर्वोच्च अधिकार आहे. अनेक जण मात्र आपल्या हक्काबद्दल उदासीन असल्याचे दिसते. उच्चभ्रू वस्तीतून मतदानाचे प्रमाण कमीच आहे. मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ (Loksabha Election 2024) असून त्यामध्ये ३६ विधानसभा मतदारसंघ येतात. २०१४ आणि २०१९ या लोकसभेच्या दोन पंचवार्षिक निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी चिंताजनक आहे. उच्च शिक्षित आणि सधन वर्गाची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी होते. मुंबईतील कुलाबा (Colaba), मुंबादेवी (Mumbadevi), वांद्रे (Bandra) पश्चिम, वर्सोवा (Versova) या उच्चभ्रू विधानसभा मतदारसंघात दरवेळी सरासरी ५० टक्क्यांहून कमी मतदान होते. या वेळी या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Loksabha Election 2024 : उच्चभ्रू वस्तीत मतदानाबाबत उदासीनता; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आयोगाकडून उपाययोजना
Loksabha Election 2024 : उच्चभ्रू वस्तीत मतदानाबाबत उदासीनता; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आयोगाकडून उपाययोजना

(हेही वाचा – IPL 2024, DC vs GT : गुजरातला ८९ धावांत गुंडाळल्यावर दिल्लीचा ६ गडी राखून विजय )

उच्चभ्रू वस्त्यांतील मतदानाची टक्केवारी कमी दिसत असली, तरी त्याला मध्यवर्गीय लोकवस्ती असलेला धारावी आणि मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अपवाद आहेत. या दोन्ही मतदारसंघात दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे.

यंदा उच्चभ्रू वस्त्यांतील मतदारसंघांवर फोकस

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टीसीपेशन (स्वीप) ही विशेष मोहीम मुंबई शहर आणि उपनगरात राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांची जनजागृती केली जाते. यंदा या विधानसभा मतदारसंघावर विशेष फोकस केला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी (स्वीप) डॉ. सुभाष दळवी यांनी दिली.

झोपडपट्टी आणि कामगार वर्गाचे प्राबल्य असलेल्या भागात ६०-६५ टक्क्यांहून अधिक मतदान होत आहे. त्यामुळे उच्चभ्रू मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहिमेसह विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक – अनिल गलगली यांचे आवाहन

आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदार यादीतील प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. मात्र, मतदानाला जाणे म्हणजे नाहक त्रास असल्याचे समजून अनेकजण मतदान करत नाहीत. या मानसिकतेमुळे एका विधानसभेत दोन-सव्वा दोन लाख मतदार असतानाही केवळ ४०-५० टक्के लोक मतदान करतात. तसेच मतदारसंघात योग्य उमेदवारांच्या निवडीअभावी लोक मतदानाला जात नाहीत. मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे, असे आवाहन खंत सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले आहे. (Loksabha Election 2024 )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.