Commercial Gas Cylinders: व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर जाहीर; जाणून घ्या

ही कपात फक्त व्यावसायिक सिलिंडरवर झाली आहे.

122
Commercial Gas Cylinders: व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर जाहीर; जाणून घ्या

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १ मेपासून तत्काळ प्रभावीपणे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती १९ रुपयांनी कमी केल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत १,७४५.५० रुपये इतकी झाली आहे.

मात्र देशांतर्गत सिलिंडरचे दर स्थिर आहेत. व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर जाणून घेऊया –

लोकसभा निवडणुकीसाठी देशात मतदान होत आहे, अशा परिस्थितीत निवडणुकीच्या वातावरणात पुन्हा एकदा सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १९ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. दिल्लीतील १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत बुधवार, (१ मे)पासून १, ७४५.५० रुपये आहे.

(हेही वाचा – सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे उद्योजक Anand Mahindra यांच्याबद्दल जाणून घेऊया..)

फक्त व्यावसायिक सिलिंडरवर कपात
ही कपात फक्त व्यावसायिक सिलिंडरवर झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर बुधवार, (१ मे) लागू झाले आहेत. त्यामुळे सिलिंडर ऑर्डर केल्यावर नवीन दराने सिलिंडर मिळतील.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल नाही…
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च महिन्यात कमी झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाने ३१ मार्च २०२५पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.