सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे उद्योजक Anand Mahindra यांच्याबद्दल जाणून घेऊया..

100

आनंद गोपाळ महिंद्रा (Anand Mahindra) हे एक मोठे भारतीय उद्योगपती आहेत. महिंद्रा ग्रुप्स अँड कंपनीजच्या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या उद्योगाचे ते अध्यक्ष आहेत. महिंद्रा ग्रुप्स अँड कंपनीच्या अंतर्गत त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे उद्योग आहेत. जसे की, शेती उपकरणे, ऑटोमोटिव्ह, बांधकाम उपकरणे, औद्योगिक उपकरणे, फायनान्स, विमा, हॉटेलिंग आणि लॉजीस्टिक रिअल इस्टेट यांसारखे अनेक क्षेत्रात महिंद्रा ग्रुप्स अँड कंपनीज कित्येक वर्षांपासून यशस्वीपणे काम करत आहे.

फोर्ब्स मॅगझीनच्या मते गेल्या वर्षी महिंद्रा ग्रुप्स अँड कंपनीजची एकूण संपत्ती २.१ अब्ज डॉलर्स इतकी होती. २०११ साली जाहीर करण्यात आलेल्या आशियातील २५ श्रीमंत लोकांच्या यादीत आंनद महिंद्रा (Anand Mahindra) यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्यांनी वंचित मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी एक संस्था देखील स्थापन केली आहे. आनंद महिंद्रा हे हावर्ड बिझनेस स्कुलचे माजी विद्यार्थी आहेत. २०२० साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

(हेही वाचा Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काँग्रेसने रचलेली भगव्या आतंकवादाची थेअरी; सर्वोच्च न्यायालयात पर्दाफाश   )

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला. त्यांच्या वडिलांचं नाव हरीश महिंद्रा आणि आईचं नाव इंदिरा महिंद्रा असं होतं. त्यांनी आपलं शालेय शिक्षण लॉरेन्स स्कुल येथे घेतलं. त्यानंतर हावर्ड युनिव्हर्सिटीमधून फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्चरचा कोर्स पूर्ण केला. १९७७ साली त्यांनी मॅग्ना कम लॉड ही पदवी मिळवली. मग त्यानंतर १९८१ साली हावर्ड बिझनेस स्कुलमधून त्यांनी आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं.

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे कला आणि संस्कृतीला नेहमीच प्रोत्साहन देतात. नाट्यक्षेत्रात चांगलं काम केल्याबद्दल महिंद्रा यांच्याकडून कलावंतांना ‘महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर’ हा अवॉर्ड देण्यात येतो. आनंद महिंद्रा यांनी २०११ सालापासून मुंबई येथे महिंद्रा ब्लु फेस्टिव्हलची सुरुवात केली आहे. तसेच सोशल मीडियावरही ते बरेक सक्रिय असतात आणि अनेकांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.