Maharashtra Day 2024 : दिवस एक आणि वैशिष्ट्ये अनेक…जय महाराष्ट्र!

114

१ मे या दिवशी आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या कामगारांच्या चळवळीला जागतिक पातळीवर यश आले होते म्हणून जागतिक कामगार दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. १ मे या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना (Maharashtra Day 2024) झाली होती. म्हणून हा दिवस महाराष्ट्र राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. याबरोबरच मराठी राज्य स्थापन झाले म्हणून मराठी भाषा गौरव दिन म्हणूनही सगळीकडे आनंद साजरा करण्यात येतो.

१९५६ सालच्या राज्य पुनर्रचना कायद्याने भारतातील भाषांच्या आधारे राज्यांच्या सीमा निश्चित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यापूर्वी बॉम्बे हे एकत्रित राज्य मानले जायचे. येथे मराठी, कोकणी, गुजराती, कच्छी या भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आघाडीने बॉम्बेचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आले. त्या भागांत कोकण किनारपट्टी सहित मुंबई हे शहर महाराष्ट्र राज्यात सामील करण्यात आलं.

(हेही वाचा Fake Video Case : अमित शहांच्या बदनामी प्रकरणाशी जिग्नेश मेवाणींचा संबंध? दोन जणांना अटक )

२५ एप्रिल १९६० साली भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायद्याप्रमाणे १ मे १९६० साली महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिनाला (Maharashtra Day 2024) विशेष परेड काढली जाते. अनेक सांस्कृतिक आणि रंगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मराठी संस्कृती आणि सभ्यतेची अनोखी आणि प्राचीन झलक पाहायला मिळते.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन करणार्‍या मराठी माणसांना कॉँग्रेसने ठार केले. त्या हुतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. महाराष्ट्राच्या मातीचे गुणगौरव अनेक मोठ्या लोकांनी गायले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करताना राम गणेश गडकरी उपाख्य गोविंदाग्रज यांनी “मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥” असे वर्णन केले आहे. कुसुमाग्रज म्हणतात, “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्‍याखोर्‍यातील शिळा” ज्ञानेश्वर माऊली तर अमृतापेक्षाही मराठी भाषा श्रेष्ठ असल्याचे म्हणतात. त्यामुळे १ मे हा दिवस खूपच विशेष आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.