Department of Meteorology: पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, ५ मेपर्यंत तापमानवाढीचा इशारा

वातावरणातील घडामोडींमुळे राज्याच्या बहुतांश भागात आलेल्या उष्णतेची लाटेचा फटका बसत आहे.

107
Department of Meteorology: पुण्यासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, ५ मेपर्यंत तापमानवाढीचा इशारा

पुणे शहरातील कोरेगाव पार्क, मगरपट्टा, लोहगाव, मगरपट्टा, वडगाव शेरी या भागांचे कमाल तापमान सतत ४३ अंशांवर जात आहे. गुजरातच्या वाळवंटातून सतत उष्ण झळा येत आहेत, मात्र हे उष्ण वारे या भागांत कोंडले जात आहेत. दिवसा आणि रात्रीही अतिशय उकाडा जाणवत आहे.  (Department of Meteorology)

भारतीय हवामानशास्र विभागाने पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. तळेगाव ढमढेरे येथे ४४, तर शिरूर येथे ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

(हेही वाचा – Commercial Gas Cylinders: व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर जाहीर; जाणून घ्या)

५ मेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार
वातावरणातील घडामोडींमुळे राज्याच्या बहुतांश भागात आलेल्या उष्णतेची लाटेचा फटका बसत आहे. सोलापूर येथे सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दररोज हंगामातील उच्चांक नोंदवला जात असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. दिवसा उन्हाचा दाह, गरम वाऱ्याचा सामना करत आहेत. किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्यामुळे रात्रीचा उकाडाही वाढला आहे. येत्या ५ मेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. सकाळी साडेदहा ते साडेचार या काळात बाहेर फिरणे टाळावे, असे आ‌वाहनही करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.