Threats Schools In Delhi: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, डॉग स्कॉड आणि दिल्ली पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू

शाळांनी विद्यार्थ्यांनी परत घरी पाठवले आहे. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

80
Threats Schools In Delhi: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, डॉग स्कॉड आणि दिल्ली पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू

दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळांना धमकीचा ई-मेल आला आहे. दिल्ली पब्लिक स्कूल (द्वारका), संस्कृती स्कूल, मदर मेरी स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल नॉयडा आणि दिल्ली पब्लिक स्कूल (आरके पुरम) यांना धमकीचे ईमेल आले आहेत. (Threats Schools In Delhi)

शाळांनी विद्यार्थ्यांनी परत घरी पाठवले आहे. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉग स्कॉड आणि दिल्ली पोलीस संबंधित शाळांमध्ये पोहोचले आहेत. शाळा परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. अद्याप पोलिसांना संशयास्पद असे काही आढळून आलं नाहीये. सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा – Commercial Gas Cylinders: व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर जाहीर; जाणून घ्या)

WhatsApp Image 2024 05 01 at 10.26.23

दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने माहिती दिली आहे की, सुरुवातीच्या तपासानुसार, कालपासून आतापर्यंत अनेक शाळांना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. सर्वांचा पॅटर्न सारखाच दिसून येत आहे. ई-मेलमध्ये तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे मेल अनेक ठिकाणी पाठवण्यात आलाय असा होतो. सध्या याप्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत.

WhatsApp Image 2024 05 01 at 10.26.23 1

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.