Narayan Rane : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वेडे झालेत; नारायण राणेंची बोचरी टीका

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. असे असले, तरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले भाजपाचे नेते Narayan Rane यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

116
Narayan Rane : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वेडे झालेत; नारायण राणेंची बोचरी टीका
Narayan Rane : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वेडे झालेत; नारायण राणेंची बोचरी टीका

संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वेडे झाले आहेत. ते काहीही बोलत असतात. भाजपाला २०० जागा मिळणार नाहीत, अमित शाह तडीपार वगैरे. संजय राऊत पंतप्रधानांबाबत काहीही बोलतात आणि प्रसारमाध्यमे दाखवतात, अशी टीका भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र; म्हणाले…)

इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावरही टीका

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. असे असले, तरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले भाजपाचे नेते नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. यावेळी नारायण राणे यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावरही टीका केली.

काँग्रेसचे जेमतेम ५० खासदार

नारायण राणे पुढे म्हणाले की, सध्या काँग्रेसचे जेमतेम ५० खासदार आहेत. आमचे ३०३ आहेत. आम्ही ४०० हून अधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. मग यांची सत्ता कशी येणार ? त्यामुळे १ लाख रुपये देऊ वगैरे जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने या थापा आहेत. काँग्रेस काही देऊ शकत नाही. त्यांची तेवढी क्षमता नाही. काँग्रेसची सत्ता होती तेव्हा काही का दिलं नाही? असा सवालही नारायण राणे (Narayan Rane) यांनी विचारला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.