IPL 2024 : सलामीच्या सामन्यात चेन्नईची बंगळुरूवर ६ गडी राखून मात 

IPL 2024 : चेन्नईचा हा सलग आठवा आयपीएल विजय होता 

102
 IPL 2024 : सलामीच्या सामन्यात चेन्नईची बंगळुरूवर ६ गडी राखून मात 
 IPL 2024 : सलामीच्या सामन्यात चेन्नईची बंगळुरूवर ६ गडी राखून मात 
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्सच्या (RCB) अनुज रावत (Anuj Rawat) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनी सातव्या आणि आठव्या क्रमांकावर फटकेबाजी करत संघाला १७५ धावसंख्येच्या जवळ आणलं खरं. पण, ही धावसंख्या चेन्नईच्या खोलवर पसरलेल्या फलंदाजांसाठी अपुरीच ठरली. आणि अखेर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने आयपीएलच्या सतराव्या हंगामात विजयाने सुरुवात केली. बंगळुरू फ्रँचाईजीचा त्यांना एक षटक आणि ६ गडी राखून पराभव केला. घरच्या चिदंबरम मैदानावर चेन्नईने मिळवेला हा सलग आठवा विजय. (IPL 2024)

(हेही वाचा- स्वातंत्र्य चळवळीत ‘हमारा संग्राम’ नावाचे साप्ताहिक संपादित करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक Subhadra Joshi)

चेन्नईच्या (CSK) विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो मुस्तफिझुर रेहमान. त्याने ४ षटकांत २९ धावा देत महत्त्वाचे ४ बळी मिळवले. बंगळुरूची (RCB) आघाडीची फळी अपयशी ठरल्यामुळे संघाला दीडशे धावा करणंही एक वेळेला कठीण झालं होतं. विराट कोहली (२१) आणि कर्णधार फाफ दू प्लेसिस (३५) यांच्या ४१ धावांच्या  सलामीनंतर रजत पाटिदार आणि ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद झाले. तर कॅमेरुन ग्रीनही १८ धावा करून बाद झाला. तेव्हा बंगळुरूची अवस्था ५ बाद ७८ झाली होती. (IPL 2024)

पण, दिनेश कार्तिकने नाबाद ३८ धावा आणि अनुज रावतने २५ चेंडूंत ४८ धावा करत संघाला ६ बाद १७३ असा समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. पण, ही धावसंख्या शेवटी अपुरीच ठरली. (IPL 2024)

(हेही वाचा- World Water Day: भूगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज तलाव स्वच्छता अभियानाचे आयोजन)

बंगळुरूच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम मुस्तफिजुरने केलं. आणि त्यानंतर त्याच्या जागी आलेल्या इम्पॅक्ट खेळाडू शिवम दुबेने नाबाद ३४ धावा करत बंगळुरूच्या जखमेवर आणखी मीठ चोळलं. दुसरं म्हणजे चेन्नई संघातील सर्वच फलंदाजांनी दुहेरी आणि त्यातही २० पेक्षा जास्त धावांची खेळी साकारली. त्यामुळे १७३ धावांचा पाठलाग करताना त्यांना अडचण अशी आलीच नाही. नवीन कर्णधार ऋतुराज (१५) आणि रचिन रवींद्र (Rachin Ravindra) (३७) यांनी ३८ धावांची सलामी करून दिली. त्यानंतरही अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) २७ धावांच्या छोटेखानी खेळीत २ षटकार ठोकून धावांचा वेग आटोक्यात ठेवला होता. (IPL 2024)

तो बाद झाल्यावर तर शिवम दुबेनं आक्रमणाची सूत्र आपल्या हातात घेतली. रवींद्र जाडेजासह संघाला विजय मिळवून दिला. २९ धावांत विराट, फाफ दू प्लेसिस, रजत पाटिदार आणि कॅमेरुन ग्रीन हे महत्त्वाचे ४ बळी टिपणारा मुस्तफिझुर रेहमान सामनावीर ठरला. (IPL 2024)

(हेही वाचा- गयाना देशाचे पहिले भारतीय पंतप्रधान Cheddi Jagan)

बाकी विराटने या सामन्यातून दोन महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं. २१ धावांच्या छोटेखानी डावांत तो तो अवघडलेला नसला तरी खूप सहजही खेळत नव्हता. त्याने चेन्नई विरुद्ध १००० आयपीएल धावांचा विक्रम या सामन्यात साजरा केला. (IPL 2024)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.