World Water Day: भूगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज तलाव स्वच्छता अभियानाचे आयोजन

या जलाशयातून भूगावमधील बऱ्याच सोसायटीमध्ये पाणीपुरवठा होतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. 

145
World Water Day: भूगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज तलाव स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुळशी तालुक्यातील भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज तलाव कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. या तलावाच्या परिसरात सध्या कचरा साचला आहे. यामुळे तलावातील पाणी वापरण्यायोग्य नसल्याने तलावाची स्वच्छता होणे आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक जल दिवस (World Water Day) निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज जलाशय स्वच्छता अभियान, रविवारी (२४ मार्च) राबवण्यात येणार आहे. या जलाशयातून भूगावमधील बऱ्याच सोसायटीमध्ये पाणीपुरवठा होतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.

प्रदूषण रहित, स्वच्छ पाण्याची उपलब्धता व्हावी आणि त्याचे संरक्षण तसेच सुरक्षिततेचे महत्व समजून घेऊन भूगाव परिसरातील रहिवासी बांधवांसाठी आणि पुढील पिढीसाठी आत्ताच कृती करणे आवश्यक आहे म्हणून परिसरातील सर्व नागरिकांना आम्ही भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावाच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. या अभियानाची सुरुवात भुगाव येथील मानस हॉटेलजवळील तलावाच्या प्रवेशद्वारापासून सकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे.

(हेही वाचा – PunyaBhushan Award: शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणक शास्त्र क्षेत्रातील ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर )

लहान मुले, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक स्वच्छता, महिलांचा अभियानात सहभाग 
या अभियानाबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सविस्तर माहिती देताना रोषी थम्पी बेलब्रुक म्हणाल्या की, भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज हा ग्रामीण वस्तीसाठी मुख्य जलस्रोत आहे. येथे विविध प्रकल्पांमुळे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सांडपाणी या तलावाताचं जातं. त्यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रदूषित होते. या पाण्यात प्लास्टिक, सुका कचरा तसेच विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. रात्रीच्या वेळी काही तरुण आणि वयस्कर नागरिक किंवा सहलीसाठी आलेल्या व्यक्तीही येथे कचरा टाकून जातात. परिसरात राहणारे नागरिक याच पाण्यात कपडे धुणे, आंघोळ करणे, इत्यादी घरगुती कामेही करतात. पिण्यासाठीही याच तलावातील पाणी वापरले जाते. येथे राहणाऱ्या लोकांकडे स्वतंत्र वॉटर फिल्टर सिस्टिम आहे. तरीही तलावात कचरा साचल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी येते. पाण्याचा रंगही बदलला आहे. ग्रामपंचायतीकडून सध्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे एक दिवसाआड पाणी येते. आर्ट ऑफ लिव्हिंगकडूनही बँगलोरमध्ये अशाच प्रकारे तलाव स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. त्यांच्याकडून मला छत्रपती शिवाजी महाराज तलाव स्वच्छता अभियान राबवण्याची संकल्पना सुचली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तलावाची स्वच्छता होणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन जागतिक जल दिनाचे औचित्त्य साधून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. याकरिता विविध स्तरांतून मदतही मिळत आहे. स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू पुरवण्यात येत आहेत. लहान मुले, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक आणि इतर कचरा असे वर्गीकरणही केले जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून मदत केली जाणार आहे. हा पहिलाच उपक्रम आहे. यापुढेही असे स्वच्छता अभियान राबवण्यात सातत्य राहिल, याकडे लक्ष दिले जाणार आहे. (World Water Day)

जलाशयाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करू नये…
आपण सगळे सुजाण नागरिक आहोत. घरी पाणी भरताना पाण्याच्या स्वच्छतेबाबत काळजी घेतो तर ज्या जलाशयातून आपल्याला पाणी मिळते त्याच्या दुरावस्थेकडे आपण दुर्लक्ष करू नये. पर्यावरण बचाव कृती समितीकडून भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावाची स्वच्छता आम्ही करणार आहोत. हे काम दुसऱ्या कोणाचे आहे असे म्हणून टाळणे चालणार नाही, उलट येणाऱ्या पिढीच्या आरोग्यासाठी आपणच ही जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने आपल्याला जमेल त्या परीने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यत: या नैसर्गिक जलस्रोत्राला नवसंजीवनी देण्यात महिला वर्गाचे योगदान मोठे आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रथमोपचार
स्वच्छतेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वत:सोबत पाण्याची बाटली, कचरा गोळा करण्यासाठी बॅग, बादली, झाडू, फावडा इत्यादी साफसफाईचे साहित्य घेऊन यावे याशिवाय बॅंडेज, एंटीसेप्टिक क्रीम, पेनड्स हे प्रथमोपचाराचे साहित्य सोबत घेऊन यावे, अशी माहिती पर्यावरण बचाव कृती समितीकडून देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.