स्वातंत्र्य चळवळीत ‘हमारा संग्राम’ नावाचे साप्ताहिक संपादित करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक Subhadra Joshi

81

सुभद्रा जोशी (Subhadra Joshi) यांचा जन्म २३ मार्च १९१९ साली इंग्रजांच्या राजवटीतील पंजाबमधल्या सियालकोट या ठिकाणी झाला. सध्या हा प्रदेश पाकिस्तान येथे आहे. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्या, राजकीय नेत्या आणि भारतीय संसदेच्या सदस्या होत्या. १९४२ छोडो भारत या आंदोलनात त्यांनी आपला सहभाग दिला होता.

त्यानंतर त्यांनी दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून काम केलं. त्यांच्या वडिलांचं नाव व्ही.एन. दत्ता असं होतं. ते जयपूर राज्यात पोलीस अधिकारी म्हणून आपला कार्यभार सांभाळत होते. तर त्यांचे चुलत भाऊ कृष्णन गोपाल दत्ता हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते.

सुभद्रा जोशी (Subhadra Joshi) यांचं शिक्षण सुरुवातीला जयपूर येथील महाराजा गर्ल्स स्कूल, मग लाहोर येथील लेडी मेक्लेगन हायस्कूल येथे झालं. त्यानंतर पुढे त्यांनी जालंधर येथे गर्ल्स कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतलं आणि पुढे लाहोर इथल्या फॉर्मन ख्रिश्चन कॉलेजमधून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.

लाहोरमध्ये शिक्षण घेत असताना सुभद्रा जोशी (Subhadra Joshi) या गांधीजींच्या विचारांनी खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वर्धा येथे असलेल्या आश्रमात जाऊन गांधीजींची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी १९४२ साली इंग्रजांच्या विरोधात पुकारलेल्या छोडो भारत या आंदोलनात भाग घेतला होता. त्या आंदोलनात त्यांनी अरुणा असफ अली यांच्यासोबत काम केलं होतं.

त्या काळात त्या अटक होण्यापासून वाचण्याकरिता दिल्ली येथे येऊन भूमिगत झाल्या होत्या आणि हमारा संग्राम या नावाचं जर्नल संपादक म्हणून चालवू लागल्या. तरी त्यांना अटक झालीच. त्यांना लाहोर येथील मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्या औद्योगिक कामगारांसोबत काम करायला लागल्या. भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी सुरू झालेल्या जातीय दंगली थांबवण्यासाठी त्यांनी शांती दल नावाच्या संघटनेची स्थापना केली. १९९८ साली सागरी छाबरा यांनी दिलेल्या मुलाखतीत सुभद्रा जोशी (Subhadra Joshi) यांनी देशासाठी केलेल्या कामाविषयी वर्णन केलेलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.