PunyaBhushan Award: शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणक शास्त्र क्षेत्रातील ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर

विकसनशील देशांतील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपानव्यतिरिक्त फक्त भारतात आहे.

88
PunyaBhushan Award: शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणक शास्त्र क्षेत्रातील 'पुण्यभूषण पुरस्कार' जाहीर

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४चा पुण्यभूषण पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला आहे .पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही घोषणा केली. डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं यंदाचे पुरस्कार्थी निश्चित केले आहेत. यावेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली .

पुरस्कराचे यंदाचे ३६वे वर्ष आहे. सलग ३५वर्षे संस्थेने, देशात आणि देशाबाहेरही प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा उपक्रम राबविला. या पुरस्काराच्या रकमेत यावर्षीपासून वाढ करण्यात आली असून २ लाख रुपये करण्यात आली आहे. पुरस्कार रकमेचा धनादेश पुरस्कार्थी डॉ. विजय भटकर यांना देण्यात येईल. पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यावेळी करण्यात येणार आहे, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

(हेही वाचा – Indian Railways : रेल्वेला ‘कॅन्सल’ तिकिटांमधून तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई)

परम-८०० आणि परम-१०००
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी १९९३ मध्ये परम-८०० तसेच १९९८ मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रतिसेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्कर अशा अनेक क्षेत्रांत हा संगणक उपयोग पडतो. विकसनशील देशांतील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपानव्यतिरिक्त फक्त भारतात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.